Onion Export । यंदा कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुरुवातीला कांद्याचे दर कोसळले त्यानंतर सरकारने कांद्याची निर्यात बंदी (Onion Export Ban) केली. सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याचे आणखी दर (Onion rate) कोसळले. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. निर्णय मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत होते. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे.
कांदा निर्यात बंदी मागे
केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यात बंदी (Onion export ban) हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी (Approval for onion export) दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली. या निर्यात बंदीची डेडलाईन (Export ban deadline) ३१ मार्चपर्यंत होती. पण डेडलाईन संपण्यापूर्वी सरकारने ही बंदी हटवली आहे.
Government Schemes । पशुपालकांना पशुधन विभागाचे आवाहन! वैरण, बियाणांसाठी करा अर्ज सादर
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी ठिकठिकाणी निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलन करत होते. सरकारने आता हा निर्णय मागे घेतला आहे. कांदा निर्यातीवरील बंदी हटवताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील कांद्याच्या साठ्याचा विचार केला आहे.
दरम्यान यापूर्वी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत अमित शाह यांना माहिती दिली होती. ज्यानंतर चर्चा करुन निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा विचार करत असल्याची माहिती काही दिवसांपासून समोर आली होती.
Havaman Andaj । शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस
अखेर आज केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आता ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. इतकेच नाही तर सरकारने बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे घसरलेले कांद्याचे दर पुन्हा पूर्ववत होतील.
Diseases Of Chickens । कोंबड्यांना होतो सर्दी-खोकल्याचा त्रास, सोप्या पद्धतीने करा उपचार