Milk rate । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. पण सध्या हा व्यवसाय (Animal husbandry) अडचणीत आला आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. कारण यंदा दुधाचे दर खूप कमी झाले आहे. शिवाय पशुखाद्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. साहजिकच पशुपालनाचा व्यवसाय अडचणीत आला आहे. पशुपालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
Government Schemes । पशुपालकांना पशुधन विभागाचे आवाहन! वैरण, बियाणांसाठी करा अर्ज सादर
या ठिकाणी मिळतोय दर
पण एका ठिकाणी गायीच्या दुधाला ४५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव (Milk price) मिळत आहे. हे लक्षात घ्या की ही अंमलबजावणी हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. येथे गाईच्या दुधाचा हमी भाव ३८ रुपयांवरून ४५ रुपये प्रति लिटर, तर म्हशीच्या दुधाचा एमएसपी ३८ रुपयांवरून ५५ रुपये प्रति लिटर केला आहे. हा हमीभाव येत्या १ एप्रिल २४ पासून लागू होणार आहे.
यामुळे शेतकरी आणि पशुपालक यांची आर्थिक स्थिती चांगली होईल. अलीकडे चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे जनावरांच्या देखभाल खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे दुधाला कमी दर मिळत असल्याने दूध उत्पादक चिंतेत होते. पण आता हा हमीभाव वाढवून दिल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होऊ शकते.
Havaman Andaj । शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस
पण महाराष्ट्राचा विचार केला तर गाईच्या दुधासाठी ३५ फॅट आणि ८.५ एनएसएफसाठी किमान ३४ रुपये १० पैसे प्रति लिटर हमीभाव केला होता. पण मागील तीन चार महिन्यांपासून दूध संघांकडून पशुपालकांना प्रति लिटर फक्त २७ ते २८ रुपये दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी नाराजी झाले होते. राज्य सरकारने ही नाराजी दूर करण्यासाठी गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पण त्यालाही पशुधनाला टॅगींग आणि ऑनलाईन नोंदणीची अट ठेवली आहे.
Diseases Of Chickens । कोंबड्यांना होतो सर्दी-खोकल्याचा त्रास, सोप्या पद्धतीने करा उपचार