Havaman andaj । कालपासुन म्हणजेच 17 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (Western Disturbance) परिणाम होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होणार आहे. राज्यातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने (Heavy rain in Maharashtra) राज्यातील काही भागांमध्ये पाठ फिरवली. पाऊस वेळेत न पडल्याने पिके जळून गेली. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावलीय.
Diseases Of Chickens । कोंबड्यांना होतो सर्दी-खोकल्याचा त्रास, सोप्या पद्धतीने करा उपचार
या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस
पुणे वेधशाळेने (Pune Observatory) पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे. (Rain in Maharashtra) जर यावेळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. (Rain Update)
तापमानात होणार वाढ
कोकणाशिवाय राज्याच्या उरलेल्या भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. तसेच राज्यात काही ठिकाणी पुढील चार-पाच दिवस राज्यातील हवामान कोरडं राहू शकते. आज एक पश्चिमी प्रकोप हिमालयाकडे येत असून किमान तापमानात पुढील दोन-तीन दिवसात किंचित वाढ होईल. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
Apple Cost In America । अमेरिकेत एक किलो सफरचंदासाठी किती मोजावे लागतात पैसे? जाणून व्हाल हैराण
दरम्यान, 20 तारखेपर्यंत वेळोवेळी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात किंचित घट होईल. 21 तारखेनंतर राज्यांमध्ये येणाऱ्या उत्तरी वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होईल. आगामी 3 ते 4 दिवसांत हवामान बदलणार असून पाऊस आणि गारपिटीसह जोरदार वारेही वाहणार असून त्याचा परिणाम दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळेल.
Bamboo Farming । बांबू लागवडी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात मुसळधार पाऊस पडेल. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. उत्तर भारतातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश आणि जूम्मू आणि काश्मिर आणि लडाख, गिलगीट या भागांमध्ये मध्यम पाऊस पडेल.
Gram Prices । कसे असतील एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर माहिती