PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana । शेतकऱ्यांसाठी शानदार योजना! 55 रुपये भरून महिन्याला मिळवा 3000 रुपये, जाणून घ्या योजना

शासकीय योजना

PM Kisan Mandhan Yojana । शेतकऱ्यांना दरवर्षी अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो. यामुळे काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे त्यांची कुटुंबे उध्वस्त होतात. त्यामुळे सरकारने काही योजनांची (Government schemes) सुरुवात केली आहे. सरकारची अशीच एक योजना (Farmers schemes) आहे.

Apple Cost In America । अमेरिकेत एक किलो सफरचंदासाठी किती मोजावे लागतात पैसे? जाणून व्हाल हैराण

किसान मानधन योजना

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 55 रुपये भरून त्यांना महिन्याला 3000 रुपये मिळत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही खूप फायदेशीर योजना (Schemes for farmers) आहे. सरकारच्या या योजनेचे नाव किसान मानधन योजना (Kisan Mandhan Yojana) असे आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत 60 वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते हे लक्षात ठेवा. वय झाल्याने शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीसाठी इतरांचा आधार घ्यावा लागतो. (Kisan Mandhan Yojana Application)

Bamboo Farming । बांबू लागवडी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने ही योजना आणली आहे. सरकारने ही योजना 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू केली आहे. जिचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये मिळतात. तसेच जर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला महिन्याला 1500 रुपये मिळतात.

Orange Farming । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी समोर आली सर्वात मोठी आनंदाची बातमी!

हे लक्षात घ्या की, 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील. वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन म्हणून देण्यात येतात. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.

Animal Husbandry । पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या

आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, शेत खसराआणि बँक खाते पासबुक असावे लागते.

Cabinet Meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय

असा करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किसान मानधन योजने’च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. यानंतर होम पेजवर जाऊन लॉगिन करून शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर आवश्यक माहिती द्या. त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा. यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल तो टाका. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.

Cotton Market । कापसाच्या दरात वाढ, किती मिळतोय दर? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *