Orange Farming । राज्यात मोठ्या प्रमाणावर संत्रीचे उत्पादन (Production of oranges) घेतले जाते. विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात संत्रीचे सर्वाधिक घेतले जाते. संत्रीला राज्यात चांगली मागणी (Demand of Orange) असते. मागणी जास्त असल्याने संत्रीची किंमतही जास्त (Orange price) असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते. अशातच आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Animal Husbandry । पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या
उभारला जाणार अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प
नुकतीच वरुड-मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत आढावा बैठक पार पडली. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरेल. हा प्रकल्प येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली. तसेच अमरावती विभागात संत्रा लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने या शेतकऱ्यांना रास्तभाव मिळणे खूप गरजेचे आहे. संत्र्यांवर अत्याधुनिक यंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सट्रेट, इसेन्सियल ऑइल, पिल पावडर, पशु खाद्य, ज्यूस, टेट्रापॅक ज्यूस, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची विविध उत्पादने केली तर संत्रा फळाची मूल्यवृद्धी होऊन त्यापासून शेतकऱ्यांना चांगला अतिरिक्त मोबदला मिळेल.
Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका खूप महत्वाची ठरेल. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरुड-मोर्शी येथे विदर्भ अॅग्रोव्हिजन प्रोड्यूसर कंपनी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळासोबत भागिदारीद्वारे संयुक्त उपक्रम म्हणून संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.
Cotton Market । कापसाच्या दरात वाढ, किती मिळतोय दर? जाणून घ्या