Milk Rate

Milk Rate । शेतकऱ्यांना पुन्हा धक्का! खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात ‘इतकी’ कपात

बातम्या

Milk Rate । अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही, त्यामुळे ते शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. परंतु सध्या पशुपालकांचे खराब दिवस सुरु आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण पुन्हा एकदा गाईच्या दुधाच्या किमतीत (Cow Milk Price) कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Sim Card । सावधान! तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? ‘या’ पद्धतीने जाणून घ्या नाहीतर..

नुकतीच गोकुळ (Gokul) दूध संघाने दरात कपात केली होती. अशातच आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनीही गाय दुधाच्या दरात 2 रुपयांची कपात (Cow Milk Price Falls Down) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये चिंतेचे आणि नाराजी वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे गाईच्या दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु मागणी कमी झाली आहे. शिवाय बटर आणि पावडरचे दर कमी झाले आहेत.

PM Kisan Yojana । धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’ चा लाभ

त्यामुळे खासगी-सहकारी दूध संघांकडून दर कपात जाहीर केली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाईच्या प्रतिलिटर दरामध्ये दोन रुपयांची कपात आणि म्हैस दुधासाठी प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जर हे असेच राहिले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *