Vegetables Price Hike

Vegetables Price Hike । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाजीपाल्यांच्या किमतीत कमालीची वाढ

बातम्या

Vegetables Price Hike । पुणे : पालेभाज्यांचे दर कधी घसरलेले असतात तर कधी खूप वाढलेले असतात. यामुळे शेतकरीवर्ग आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो. सध्या पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अवाक कमी झाल्याने भाज्या महाग (Vegetables Price) झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

Milk Rate । शेतकऱ्यांना पुन्हा धक्का! खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात ‘इतकी’ कपात

सध्या पितृपक्ष (Pitru Paksha 2023) सुरु आहे. पितृपक्ष आणि पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. पितृपक्षात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मागणी वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर तीन पट वाढले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीरचे दर गगनाला भिडले आहे. ग्राहकांना ती पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागत आहे.

Sim Card । सावधान! तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? ‘या’ पद्धतीने जाणून घ्या नाहीतर..

या भाज्यांचे वाढले दर

पूर्वी टोमॅटो, वांगे, भेंडी आणि इतर भाज्यांना १० ते २० रुपये प्रति किलोचा दर मिळत होता, गणेशोत्सव सुरू होताच हे चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले. सध्या भाजीपाल्याच्या दरात तीन पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना जास्त दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

PM Kisan Yojana । धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’ चा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *