PM Kisan Yojana । राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान (Kisan Yojana) या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजारांचा लाभ दिला जातो.
Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प
२१,१९३ खातेदार अपात्र
जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्यांना आता सरकारने ई- केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक केलं आहे. त्यासाठी सरकारने आतापर्यंत त्यांना पाच वेळा मुदतवाढ दिली होती. तरीही २१,१९३ खातेदारांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांची नावे यादीतून वगळली आहेत.
दरम्यान, आतापर्यंत या योजनेचे १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. परंतु या योजनेत काही पात्र नसलेले शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ थांबविला असून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाभार्थ्यांना आधार लिंक आणि ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ई-केवायसीसाठी गावागावात शिबिरे घेतली होती. २,६४,९९५ खातेदारांनी ही प्रक्रिया केली आहे.
या दिवशी येणार पुढचा हप्ता
परंतु २१,१९३ खातेदार सूचना देऊनही त्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे त्यांची नावे आता बाद केली आहे. या योजनेचा १५ वा हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबरदरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, त्याबाबत सजूनही सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.