Crop Insurance Scheme । दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसतो. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. साहजिकच शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. परंतु अनेकदा त्यांना कर्ज फेडता येत नाही. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने एक खास योजना (Crop Insurance) आणली आहे. ज्यातून त्यांना आर्थिक नुकसानापासून वाचता येईल. काय आहे सरकारची ही योजना? जाणून घ्या.
पंतप्रधान पीक विमा योजना
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PM Crop Insurance Scheme) शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. आता शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात. शेतकऱ्यांना योजनेमुळे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळते. शिवाय या योजनेंतर्गत विमा (Crop Insurance Application) प्रीमियमची रक्कम अतिशय कमी ठेवली आहे, त्यामुळे लहान शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं बक्कळ कमवलं! कमी खर्चात मिळवला लाखोंचा नफा
असा मिळवा लाभ
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकतात. तुम्ही जवळच्या सीएससी शाखेशीही संपर्क साधू शकता. ऑनलाइन अर्जासाठी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. त्या ठिकाणीही तुम्हाला योजनेशी निगडित अधिक माहिती मिळेल. पीएम पीक विमा योजना मोबाइल अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.
अशी करा ऑनलाईन नोंदणी
- सर्वात अगोदर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- या वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर दिसेल.
- आता या होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नर अप्लाय फॉर क्रॉप इन्शुरन्स या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे तुमच्या समोर Farmer Application पेज येईल. यावर तुम्हाला Guest Farmer या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. तुम्ही क्लिक करताच, तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म येईल.
- या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- माहिती भरल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा, तुमचा अर्ज भरला जाईल.