Sugarcane Harvesting

Sugarcane Harvesting । ‘कारखान्यांनी उचल जाहीर केल्याशिवाय चालू हंगामात ऊसतोडणी नाही’, रयत क्रांती संघटनेची आक्रमक मागणी

बाजारभाव

Sugarcane Harvesting । ऊस दरावरून सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ आता शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यामधील ऊस दराची (Sugarcane FRP) कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड केली जाणार नाही, असा निर्णय स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या वतीने घेतला होता.

Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं बक्कळ कमवलं! कमी खर्चात मिळवला लाखोंचा नफा

अशातच आता चालू हंगामात उचल (Sugarcane Rate) जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी नको, असा पवित्रा रयत क्रांती संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आता या संघटनेची मागणी मान्य होणार का? याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. २०२३-२४ च्या हंगामातीलअहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील उसाची पहिली उचल जाहीर करा, अन्यथा गाळप परवाना देऊ नका, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे यांनी केली आहे.

PM Kisan Yojana । दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा धक्का! खात्यावर येणार नाही 2 हजार रुपये, नेमकं कारण काय?

दरम्यान, काही कारखाने पहिली उचल वेळेत देत नाहीत. यंदा जिल्ह्यात पाऊस वेळेवर झाला नाही, त्यामुळे उसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे जनावरांना चारा मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी ऊस जनावरांचा चारा म्हणून वापरत आहे. यामुळे उसाची पहिली उचल साडेतीन हजार आणि अंतिम रक्कम चार हजार रुपये मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Havaman Andaj । बिग ब्रेकिंग! पुढील ४ दिवस अवकाळीचं सावट, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना दिला जोरदार पावसाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *