Crop Insurance । प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन 2020-21 मधील (Prime Minister Crop Insurance) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास काही पिक विमा कंपन्या उशीर करत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल सरकारकडून घेण्यात आली आहे. ‘येत्या 8 दिवसात पीक विम्याची भरपाई करा, नाहीतर कारवाई होणार,’ असा इशारा कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला आहे.
विमा कंपन्यांकडून भरपाई करण्यास उशीर होत असल्याने त्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “खरीप 2020 हंगामात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते. परंतु यावेळी लॉकडाऊन आणि इतर कारणे असल्याने नुकसान झाल्याची माहिती शेतकरी विमा कंपन्यांना (Insurance Company) सूचना देवू शकले नाहीत.”
8 दिवसात नुकसानभरपाई द्या, अन्यथा..
“खरीप 2020 हंगामातील NDRF अंतर्गत केलेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याविषयी विमा कंपन्यांना कळविले होते. परंतु, आता विमा कंपन्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून नुकसान भरपाई देत नाहीत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतअंतर्गत (PM Crop Insurance) सहभागी 6 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांकडे 224 कोटी रुपये देयक बाकी असून या कंपन्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. येत्या 8 दिवसात नुकसानभरपाई वितरणाबाबत कंपन्यांनी निर्णय घ्यावा. नाहीतर यासंदर्भात राज्य स्तरावर आढावा घेऊन नियमानुसार कारवाई करण्यात येईल,” असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
Kisan Loan Portal । कर्ज मिळवणे झाले आणखी सोपे! सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणले एक पोर्टल
दरम्यान, या बैठकीत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स, बजाज एलियांझ, भारती ॲक्सा, रिलायन्स इन्शुरन्स इतर कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
Udid Rate । दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उडदाल किती भाव मिळाला? वाचा एका क्लिकवर