Kisan Loan Portal

Kisan Loan Portal । कर्ज मिळवणे झाले आणखी सोपे! सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणले एक पोर्टल

शासकीय योजना

Kisan Loan Portal । शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार सतत कोणत्या ना कोणत्या योजना (Government Schemes) राबवत असते. ज्याचा फायदा देशभरातील करोडो शेतकरी वर्गाला होतो. बऱ्याचवेळा शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य तो हमीभाव न मिळाल्याने कर्ज घ्यावे लागते. काहीजण बँकेकडून कर्ज घेतात. परंतु त्यांचे व्याजदर जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर जास्त ताण येतो. (Schemes for Farmers)

Udid Rate । दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उडदाल किती भाव मिळाला? वाचा एका क्लिकवर

शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने खास शेतकऱ्यांसाठी एक नवीन पोर्टल सुरु केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना किसान क्रेडिटच्या (KCC) माध्यमातून कर्ज घेता येते, विशेष म्हणजे याच्या माध्यमातून मिळणारे कर्ज अतिशय सोप्या पद्धतीने मिळावे आणि त्यासोबत इतर अनुदानित कर्ज शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने नवीन पोर्टल विकसित केले आहे.

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात आज चढ की उतार? वाचा एका क्लिकवर

किसान कर्ज पोर्टल

ज्याचे नाव किसान कर्ज पोर्टल (Kisan Loan Portal) आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डेटा, व्याज सवलत, कर्ज वाटपाची माहिती आणि योजनेची प्रगतीची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड कर्ज खातेधारकांशी निगडित असणारी माहिती या पोर्टलवर उपलब्ध होईल. सर्व किसान क्रेडिट कार्ड खातेधारकांची पडताळणी आधारद्वारे केली जाईल.

Onion Rate | लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज किती दर मिळाला? जाणून घ्या

मिळेल कर्जमाफी

त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास मदत मिळेल. याच्या माध्यमातून थेट पात्र लाभार्थींना व्याज सवलतीच्या दाव्यांचे पेमेंट पाठवण्याची योजना आहे. सरकारला योजनांचे लाभार्थी आणि थकीत शेतकऱ्यांचे मूल्यांकन करता येईल. यासाठी किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी नाही तर पीक जोखीम कमी करणे आणि आपत्ती जोखीम कमी करण्याच्या उपायांची माहिती तसेच विमा संबंधित चालवल्या जाणाऱ्या नॉन प्लांट पॅरा मॅट्रिक माहिती मिळेल.

Solar pumps । सावधान! ‘या’ ठिकाणी चोरटयांनी घातलाय धुमाकूळ; शेतातील सौर पंपांची रातोरात चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *