Bullock Cart Race । काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart) सशर्थ परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. आता यात्रा किंवा इतर कार्यक्रमादरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. नागरिक देखील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी खूप गर्दी करतात.
Sugarcane । चर्चा तर होणारच! महिलेने एकरी १५० टन उत्पादन घेत पटकावला राज्य पुरस्कार
अशातच आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना बैलगाडा स्पर्धांच्या परवानगी देण्याचे अधिकार दिले आहेत. ही परवानगी सात दिवसांत देणे बंधनकारक आहे. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त यांच्याकडील परिपत्रकान्वये राज्यातील बैलगाडा शर्यती आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करून नियम व अटी-शर्थीचे काटेकोरपणे पालन करून बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आलीय.
Government Schemes । सरकारी अनुदानासह खरेदी करा जमीन, ‘या’ लोकांना मिळतोय लाभ
गावागावांत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार
दरम्यान, महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरेनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशा प्रसंगी रायगड जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींना परवानगीसाठी मोठया प्रमाणावर अर्ज दाखल होतात. त्यानंतर सात दिवसांत शर्यतीसाठी परवानगी देण्यात येते. पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्जदारास आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत सादर करणे, कागदपत्रांची/त्रुटींची पूर्तता करणे तसेच संबंधित विभागांचे अहवाल/अभिप्राय प्राप्त होणे यासाठी खूप वेळ लागतो.
Foreign tour of farmers । मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला दीड कोटींचा निधी
त्यामुळे आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार बैलगाडा शर्यतीस परवानगी देण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचनांमध्ये नमूद केलेल्या नियमानुसार ही परवानगी दिली जाईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर परवानगी मिळणार असल्याने आयोजकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.