Hydroponics feed

Hydroponics feed । शेतकरी मित्रांनो! तंत्रज्ञानाच्या मदतीने काही क्षणात बनवा हिरवा चारा

बातम्या

Hydroponics feed । भारत हा जगातील सर्वात जास्त पशुधन (livestock) असणारा देश आहे, जिथे पशुधन 4.8% च्या दराने वाढत आहे. पशुधन क्षेत्राच्या विकासासाठी पुरेसा तसेच पौष्टिक अन्न आणि चाऱ्याचा नियमित पुरवठा होणे गरजेचा आहे. जनावरांच्या संतुलित आहारामध्ये (Balanced diet) हिरव्या चाऱ्याला खूप महत्त्व आहे. हिरवा चारा हा जनावरांसाठी पोषक तत्वांचा किफायतशीर स्त्रोत आहे.

Compost Fertilizer । सोप्या पद्धतीने करा घरच्या घरी कंपोस्ट खत, कसं ते जाणून घ्या

अशातच देशातील शेतजमिनीची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आता हायड्रोपोनिक (Hydroponic) पद्धतीने हिरवा चारा उत्पादन हा एक चांगला पर्याय पुढे येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हायड्रोपोनिक पद्धतीने (Hydroponic feed) मका, बार्ली, गहू, बाजरी इत्यादी हिरव्या चाऱ्यासाठी योग्य असणाऱ्या धान्यांच्या बिया माती नसलेल्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये पेरण्यात येतात. याची उगवण झाल्यानंतर सुमारे 7-8 दिवसात हिरव्या वनस्पतींची वाढ होते. (Hydroponics technique)

Crop Loan Subsidy । शेतकऱ्यांवर अन्याय, पीक कर्जाची नियमीत परतफेड करूनही मिळाले नाही अनुदान

हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. हायड्रोपोनिक्स पद्धत म्हणजे पाण्याचा वापर करून माती विना वनस्पतीची वाढ होय. मराठीत यालाच “जलजन्य वनस्पती” असे देखील म्हटले जाते. याचे उदाहरण सांगायचे झाले तर घरात बाटलीत पाणी भरून त्यात वाढवला जाणारा “मनी प्लांट”. वनस्पतीच्या वाढीला लागणारे घटक पाण्यातून पुरवून त्या मातीविना सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती वाढविल्या जातात.

Bull price hike । बैलांची किंमत पोहोचली लाखांच्या घरात, खरेदीसाठी तुफान गर्दी

अशी होते निर्मिती

  • मका, गहू, बार्ली किंवा ओट यांसारखे धान्य १२ तास पाण्यात भिजवून, १२ ते २४ तास मोड येणेसाठी गोणपाटात गुंडाळून ठेवतात.
  • हे धान्य प्लास्टिक ट्रे मध्ये पसरवून त्याचा एक थर बनवा.
  • त्यावर दर दोन तासाने ३-६ मिनिटे पाणी स्प्रिंकलरने फवारावे.
  • अवघ्या दहा ते बारा दिवसात अंकुर वाढून २५-३० से.मी. वाढतात.
  • एक किलो धान्यापासून आठ ते दहा किलो हिरवा ताजा चारा तयार होतो.
  • हे अंकुर दहा किलोपर्यंत एका मोठ्या जनावराला रोज चारता येतात.
  • हे लक्षात घ्या की यामध्ये फुटलेले दाणे वापरू नये.
  • ज्वारीदेखील वापर करू नये कारण ती जनावरांना अपायकारक असते.

Agricultural Loans । शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती

जाणून घ्या फायदे

  • जनावरांची प्रतिकारशक्ती वाढते.
  • कमी जागेत, कमी पाण्यात, कमी वेळेत आणि कमी खर्चात पौष्टिक चारा तयार होतो.
  • जनावरांना 90% चारा पचवता येतो.
  • चारा खर्चात 40% कपात होते.
  • दुधातील फॅटचे प्रमाण वाढवून, दुधाचे उत्पादन वाढते.
  • प्राण्यांच्या शरीरात प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची उपलब्धता वाढते.
  • प्राण्यांची प्रजनन क्षमता सक्रिय होते.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सरसकट शेतकऱ्यांना घेता येणार विहिरीचा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *