Bull price hike

Bull price hike । बैलांची किंमत पोहोचली लाखांच्या घरात, खरेदीसाठी तुफान गर्दी

बातम्या

Bull price hike । काही ठिकाणी आजही शेतीच्या कामांसाठी बैलाचा वापर (Bull uses) केला जातो. नांगरणी, पेरणी यांसारखी कामे बैलाच्या मदतीने करतात. बैलांच्या विविध प्रकारच्या जाती (Bull varieties) आहेत. शिवाय बैलगाडा स्पर्धेसाठीही बैलांचा वापर करतात. खरंतर बैलगाडा स्पर्धा (Bullock cart competition) सुरु झाल्यापासून बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. अनेक महागडे बैल बाजारात विकायला येतात.

Agricultural Loans । शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती

बैलांच्या विविध जाती

सध्या हंडरगुळीच्या बाजारात महागडे बैल (Bull price) दाखल झाले होते. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस हा बाजार सुरु असतो. बैल खरेदीसाठी या ठिकाणी राज्यासह परराज्यातील शेतकरी, व्यापारी, पशुपालक येत असतात. बाजारात देवणी, लाल कंधारी, गावरान, संकरित आदी जातींची (Different breeds of bulls) जनावरे विक्रीला आणल्याचे पाहायला मिळते.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सरसकट शेतकऱ्यांना घेता येणार विहिरीचा लाभ

विजयादशमीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येथे जनावरांच्या बाजाराची सुरुवात होते. एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत हा बाजार सुरु असतो. बाजारात खरेदीदारांना जनावरे चांगली दिसल्यास त्याचा सौदा केला जातो. शिवाय येथे मध्यस्थी करणारे देखील उपस्थित असतात. त्यांना देखील काही पैसे दिले जातात. त्यामुळे हा व्यवसाय परवडतो.

Success Story । चर्चा तर होणारच! मन रमत नाही म्हणून सोडली पोलिसाची नोकरी, आज तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई

गाईची देखील खरेदी

एक रुपयाचे नाणे मुठीत धरून बैलांच्या पाठीवर ती मूठ थोपटून किंमत निश्चित करतात. सध्या चांगल्या बैलांची किंमत लाखो रुपयांच्या घरात गेली आहे. बैलगाडा स्पर्धा देखील बैलांच्या किमती वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या गाईच्या दुधाचे दर कमी झाले आहेत. तरीही येथे गाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.

Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई

वास्तविक, लाखमोलाचा खरेदी विक्री व्यवहार करत असताना विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तर काही ठिकाणी विश्वास लोप पावत असल्याचे पाहायला मिळते. परंतु, हंडरगुळी येथील जनावरांच्या बाजारात एक रुपयाच्या नाण्यावर पशुधनाचा तब्बल लाख रुपयांचा सौदा करण्यात येत आहे. त्यानुसार ठरवलेली रक्कम अदा केली जाते.

Mini Tractor Subsidy । आता 90% अनुदानावर करा मिनी ट्रॅक्टर खरेदी, ‘या’ ठिकाणी करा तातडीने अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *