Dhananjay Munde

Dhananjay Munde । ब्रेकिंग! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय

बातम्या

Dhananjay Munde । कांद्याला बाजारभाव (Onion price) असो किंवा नसो, प्रत्येक वर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रब्बी तसेच खरीप हंगामामध्ये कांद्याची लागवड (Onion cultivation) करण्यात येते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कांद्याचाही समावेश आहे. अशातच यंदा कांद्याचे दर (Onion) खूप कमी झाले आहेत. कांद्याची निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांवर हे संकट आले आहे.

Wheat crops । गव्हाच्या पिकामध्ये गुळासोबत करा ‘हा’ अनोखा प्रयोग, उत्पन्नात होईल वाढ

बाजारभाव (Onion rate) नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. केंद्र सरकारने (Central Govt) लवकरात लवकर कांद्याची निर्यात बंदीचा (Onion export ban) निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विरोधक देखील कांद्याच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत आहे. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Farming on AI । काय सांगता! बारामतीत केली जातेय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती

कांद्याची भुकटी करण्याचा पथदर्शी प्रकल्प

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेत, कांद्याची भुकटी करण्याचा पथदर्शी प्रकल्प ‘स्मार्ट’ योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Onion Powder Project in Nashik) यासाठी नाशिक जिल्ह्याचे माजी विधान परिषद सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मागणी केली होती.

Sugarcane workers । ऊसतोड कामगारांबाबत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

मिळणार ९०% पर्यंत अनुदान

याबाबत धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी ६०% ऐवजी ९०% पर्यंत अनुदान देण्यात यावा. यासाठी तसा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे निर्देश विभागाला दिला आल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होईल. ज्याचा त्यांना उत्पन्नात खूप मोठा फायदा होईल. (Onion Powder Project)

Papaya Rate । रक्ताचं पाणी करून बाग फुलवली मात्र तरीही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच, पपईच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे आणि भावातील चढउतारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कांदा पावडरिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये ते सुरू करण्याची योजना आहे. ज्या अंतर्गत कांद्याची पावडर बनवण्यात येणार आहे. ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल.

VR glasses | रशियात गायींना लावला जातो व्हीआर चष्मा, दूध उत्पादनात होते मोठी वाढ; वाचा सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *