Crop Insurance । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे याचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. अनेक जण आर्थिक परिस्थिती नसल्याने कर्ज घेतात. पण काही शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही, त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच परिस्थिती समजून घेऊन सरकार विविध योजनेची सुरुवात करते. यापैकीच एक योजना म्हणजे पिक विमा योजना होय.
Tamarind Rate । आंबट गोड चिंच खातेय भाव! प्रति क्विंटन मिळत आहे ‘इतका’ दर
पण पिक विमा मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राजस्थानच्या जैसलमर जिल्ह्यातील भणियाणा तालुक्यातील एक शेतकरी पिक विमा मिळत नसल्याने थेट मोबाईल टॉवरवर चढला. येथील शेतकरी पिक विम्यासाठी सतत आंदोलन करत आहेत.
Soyabeen Rate । सोयाबीन उत्पादकांवर आर्थिक संकट! भाव नसल्याने पीक घरातच पडून
पिक विमा अधिकाऱ्यांनी सरकारकडे चुकीची माहिती दिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळत . जानेवारी महिन्यात या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनानंतर जिल्ह्यांमधील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा दिला जात आहे. पण भणियाणा तालुक्याच्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
यावेळी संतापलेल्या या शेतकऱ्यांयने मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याने स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील पिक विमा नुकसानीची नवीन नोंद आणि भरपाई मागणी केली आहे. किशन सारण असे या आंदोलन शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते.
अखेर किशन सारण हा शेतकरी मोबाईल टॉवर चढला, या तालुक्याचे प्रांत अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या शेतकर्याला महिनाभरात पिक विम्याची रक्कम जीयो टॅगिंग करत असून पुन्हा पिक विमा नोंदणी करण्याची आश्वासन दिले. त्यानंतर या शेतकऱ्याने टॉवर वरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. आश्वासनानंतर शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळणार नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Amit Shaha । शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष कोणामुळे फुटला? अमित शहा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट