Foreign tour of farmers । अलीकडच्या काळात शेतीत अनेक बदल झाले आहेत. शेतीची जवळपास सर्वच कामे यंत्रांच्या मदतीने केली जाऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होऊ लागली आहे. केंद्र आणि राज्य सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Govt schemes) सुरु करत असते. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो.
राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे योजना
सरकारची अशीच एक योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परदेश दौरा करता येणार आहे. नवीन कृषी तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी सन २००४ पासून ‘राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ (Foreign tour) ही योजना सुरु करण्यात आली आहे. कृषी विभाग (Department of Agriculture) ही योजना राबवत आहे. २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता २ कोटींचे अनुदानातून ७० टक्के खर्चाला मान्यता देत सरकारने (Government) दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे.
Milk business । महाराष्ट्रातील ‘हे’ अख्ख गाव करतंय दूध व्यवसाय, होतेय लाखोंची कमाई
या योजनेअंतर्गत एकूण १२० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी ही योजना सतत बंद पडत होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला पुन्हा सुरुवात करता यावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान या बाबत राज्याच्या कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी २ जानेवारी २४ रोजीच्या प्रस्ताव सादर केला.
दौऱ्यात विविध प्रगत देशांतील शेतमालाची निर्यात, बाजारपेठेतील मागणी, कृषी मालाचे पणन, कृषी माल प्रक्रिया यांचा अभ्यास करता येईल. तसेच शेतकऱ्यांना या दौऱ्यात शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेतून यंदा राज्यातील १२० शेतकरी आणि ६ अधिकारी यांची निवड केली जाणार आहे.
Wheat crops । गव्हाच्या पिकामध्ये गुळासोबत करा ‘हा’ अनोखा प्रयोग, उत्पन्नात होईल वाढ
या ठिकाणी साधा संपर्क
लवकरच परदेश दौऱ्यासंदर्भात कृषी विभागाकडून अधिकृत पत्राद्वारे जाहीर सूचना देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण यांच्याशी संपर्क साधावा लागेल.
Farming on AI । काय सांगता! बारामतीत केली जातेय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती
जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता
- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्याने पूर्वी शासकीय योजनेच्या माध्यमातून परदेश दौरा केला नसावा
- शेतकऱ्याच्या नावे ‘सातबारा’, आठ ‘अ’चा उतारा असावा. शेतकऱ्याचे वय २१ ते ६२ च्या दरम्यान असावे.
- शेतकऱ्याकडे पासपोर्ट आणि तो शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा.
- शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट