Sharad Pawar

Sharad Pawar । मी कृषीमंत्री झाल्यावर पहिली फाईल… नेमकं काय म्हणाले शरद पवार?

बातम्या

Sharad Pawar । भारत हा कृषिप्रधान देश आहे, अर्थव्यवस्थेत (Indian Economy) कृषीचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी शेतात अनेक पिके घेतात. शेतकरी पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. त्यात त्यांना फारसा फायदा होत नव्हता. त्यामुळे शेतकरी आधुनिक पद्धतीकडे वळाले आहेत. दरम्यान, नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (Sharad Pawar Inspire Fellowship) प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Onion Export । ब्रेकिंग! दोनच दिवसात घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

जुन्या आठवणींना दिला उजाळा

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिक्षण, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार केला. शेतीच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे (Scientists) अभिनंदन शरद पवार यांनी केले. बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपला देश स्वत:ची गरज भागवून जगातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करत आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी

तेव्हा पहिलीच फाईल….

बोलताना पवार म्हणाले “मी जेव्हा केंद्रात कृषी पदाची (Minister of Agriculture) जबाबदारी स्विकारली तेव्हा पहिलीच फाईल माझ्याकडे आली की ब्राझीलमधून अन्नधान्य आयात (Food grain imports from Brazil) करायचे. हे पाहून मी खूप अस्वस्थ झालो होतो. त्यावेळी मी ठरवलं होतं ही परिस्थिती अशी ठेवायची नाही. हे चित्र बदलायला हवं आणि पुढच्या पाच ते सहा वर्षात सगळं चित्र बदलून आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाले”, असे शरद पवार म्हणाले.

Pest control । गोचीड नियंत्रणाविषयी महत्वाची माहिती

“साहित्याच्या क्षेत्रात नवनवीन लेखक येत असून ते इतरांना प्रेरीत करतात. महत्त्वाचे म्हणजे हे चित्र फक्त पुणे मुंबईपर्यंत नाहीतर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्या पर्यंत पाहायला मिळत आहेत. यामुळे विविध प्रकारचे लिखाण वाचायला मिळते. एका कवीनं मूर्तिकाराची कविता ऐकवली होती. तो बोलला मी ह्या ठिकाणी हातोड्याने ब्रम्ह विष्णू महेश घडवले आहेत. त्यानंतर त्यांना मंदिरात ठेवलं गेले.

Causes and remedies for animal clogging । जनावरांचा जार अडकण्याची कारणे व उपाय

परंतु, त्या मंदिरात मला प्रवेश दिला गेला नाही. त्यांना मी विचारलं हे जे ब्रह्म विष्णू महेश घडवले त्यांना बनवणारा मी आहे. मग मला कसे नाकारणार. अशा नवनवीन आशयाच्या अनेक कविता ऐकल्या आणि त्यातुन नवीन लेखक पाहिले असे शरद पवार म्हणाले.

Signs of identifying mange in animals । जनावरांतील माज ओळखण्याची लक्षणे कोणती? पशुपालकांनो वाचा फायद्याची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *