Biofloc fish farming

Biofloc fish farming । एकच नंबर! आता मत्स्यपालनात देखील नवं तंत्रज्ञान, कमी जागेत मिळणार बक्कळ पैसे

बातम्या

Biofloc fish farming । सरकार आता कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे. ज्याचा लाभ घेऊन अनेकजण आपला व्यवसाय सुरु करत आहेत. त्यापैकी एक व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन (Fisheries) होय. हल्ली मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन केले जात आहे. पण आता तुम्ही मत्स्यपालनातून बक्कळ नफा मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊयात. (Fish farming)

Goat Farming Business । आता बिनधास्त करा शेळीपालन, ‘ही’ बँक देतेय 50 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मागील ५०-६० वर्षांमध्ये मत्स्य संवर्धन क्षेत्रात वापरले जाणारे विविध तंत्रज्ञान (Fish Culture Technology) आणि प्रणाली यांचा वेगाने विकास झाला असून मत्स्य संवर्धन क्षेत्रात (Fish Conservation Areas) वापरले जाणारे तंत्रज्ञान हे संवर्धन करण्यात येणाऱ्या मत्स्य प्रजातींची जलद वाढ व त्यांचा जीवित दर सुधारण्यासाठी वापरली जात आहेत. यामध्ये बायोफ्लॉक तंत्रज्ञान, पुनर्वापर मत्स्यसंवर्धन प्रणाली, गिफ्ट तिलापिया माशांचे संवर्धन, पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन, पंगस माशांचे संवर्धन, सुधारित बिजांचे संगोपन, पाण्याची प्रत मोजणारे आणि पाण्याची प्रत सुधारणारे संयंत्र, स्वयंचलित फिडर इत्यादी. (Fish Conservation Areas Technology)

Gram Cultivation । शेतकऱ्यांनो, हरभऱ्यावर या औषधाचा करा वापर; होईल मोठा फायदा

जाणून घ्या बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे फायदे (Biofloc technology)

  • मत्स्य संवर्धनादरम्यान खाद्याचे आणि प्रथिनांचे कमी प्रमाण लागते.
  • जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक करता येते आणि माशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
  • जैवपुंज स्वरूपातील जिवंत खाद्य सतत उपलब्ध असून माशांची वाढ जलद होण्यास मदत होते.

Intercropping । शेतकरी बांधवांनो, उसात घ्या ‘ही’ आंतरपिके; अवघ्या 3 महिन्यात होईल लाखोंची कमाई

या आहेत आवश्यक बाबी

  • यासाठी जास्त प्रमाणात आणि सतत लागणारा वीज पुरवठा लागतो.
  • अखंड वीज पुरवठा नसेल तर जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय असावी तलाव निर्मिती प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते.
  • कार्बन घटकांच्या वापरावर जास्त खर्च येतो.

बायोफ्लॉक तंत्रज्ञान

  • बायोफ्लॉक तयार करण्यासाठी ईनाकुलम (संरोप/विरजण) तयार करावा लागतो आणि संरोप तयार करण्यासाठी तलावातील सुकी माती वापरण्यात येते.
  • १८ ते २२ मिलिग्रॅम माती १२ मिलिग्रॅम अमोनियम सल्फेट तसेच २२० मिलीग्राम आंबवलेली उसाची काकवी प्रति लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रणमध्ये आवश्यक प्रमाणात बुडबुडे हवा (एरिएशन) सोडण्यात येते.
  • हे लक्षात घ्या की ४५ तासानंतर तयार झालेली संरोप तलावात सोडण्यात येतात.
  • तसेच प्रति घनमीटर जागेसाठी ४५ ते ५५ लिटर संरोप वापरावे एरिएशन हा या तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक असून पाण्याचे योग्य अभिसरण होण्यासाठी तलावाचे चारी कोपरे गोलाकार करून घ्यावे लागतात. संवर्धित मासळीने न-खालेले पूरक खाद्य आणि उत्सर्जित झालेल्या नायट्रोजन याचा वापर करून जिवाणू आणि एक पेशी वनस्पतींचे जैव पुंज तयार करण्यात येतात. जे संवर्धित मासळी खाद्य म्हणून वापरते, त्यामुळे माशांना पूरकखाद्य कमी प्रमाणात लागत असून खाद्याचा अपव्यय होत नाही.

Ethanol Production । मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल निर्मितीसाठी होणार मकेची खरेदी, जाणून घ्या दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *