Ethanol Production । इतर पिकांच्या तुलनेत राज्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड (Maize Cultivation) केली जाते. कमी वेळेत हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून मकेची ओळख आहे. मकेच्या अनेक जाती आहेत, तुम्ही जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या जातीची निवड करू शकता. अशातच आता मका (Maize) उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Havaman Andaj । ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
मकेपासून होणार इथेनॉल निर्मिती
इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आता ऊसाऐवजी थेट मकेचा वापर केला जाणार आहे. साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती (Ethanol production) ही ऊसाऐवजी मकेपासून करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मका उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Ethanol production form maize)
इथेनॉल निर्मात्यांना सहकारी संस्थांकडून ठराविक दराने मकेचा पुरवठा केला जाईल. यामुळं इथेनॉलचे अखंड उत्पादन सुनिश्चित होणार आहे तर दुसरीकडे बाजारात साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यास मोठी मदत होईल. साखरेचं उत्पादन वाढण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण यंदा दरवर्षी पेक्षा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळं साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मकेपासून इथेनॉल निर्मितीला सरकार चालना मिळेल. जुलै 2023 ते जून 2024 दरम्यान देशातील मका उत्पादन 22.48 दशलक्ष टन अपेक्षित असून ही आकडेवारी कृषी मंत्रालयाकडून आपल्या पहिल्या प्रगत अंदाजात देण्यात आली आहे. तर तेल कंपन्यांनी कॉर्नपासून बनवलेले इथेनॉल खरेदीचा भाव 5.79 रुपये प्रति लिटर केले आहेत.
Samriddhi Yojana । आनंदाची बातमी! महिला समृद्धी योजनेतून मिळणार बचत गटांसाठी चार टक्के दराने व्याज
मिळणार हा दर
यंदा सहकारी संस्था नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांना इथेनॉल तयार करण्यासाठी 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने मका पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दोन्ही सहकारी संस्था 2023-24 या पीक वर्षात 2,090 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किंमतीवर मका खरेदी करून इथेनॉल निर्मात्यांना 2,291 रुपये प्रति क्विंटल या भावाने पुरवठा करतील.
Amul Dairy । 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर