Krushi Batmya

Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी

बातम्या

Krushi Batmya । निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे (Agriulture) मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. साहजिकच शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. यंदा राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने (Heavy Rain) आणि गारपिटीने थैमान घातले होते. त्यामुळे हजारो हेक्टरवर असणाऱ्या शेतीचे नुकसान (loss of agriculture) झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

Sugarcane Labor Unions । उसतोड मजुरांसाठी आनंदाची बातमी! उसतोडणी दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ

मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे

याच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब समोर येत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल व वन विभागाच्या (Revenue and Forest Departments) माध्यमातून यासंबंधीचे महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात निर्णय घेतला होता.

Havaman Andaj । महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्यासारखी पिके आणि अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Orchard damage) झाले. त्यामुळे राज्य सरकारने नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय घेतला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी नुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी 13600 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36 हजार रुपये मिळणार आहेत.

Government schemes । खुशखबर! लहान शेतकऱ्यांनाही मिळेल तलाव खोदण्यासाठी अनुदान, असा करा अर्ज

सरकारने जारी केले परिपत्रक

याबाबत निर्देश राज्याच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून परिपत्रकाद्वारे आता जारी करण्यात आले आहेत.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, निकषांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले होते. परंतु, अद्यापही त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. याच संदर्भात आता या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेतली आहे.

Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर जात तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये अवकाळी पावसाने आणि गारपिटीचा फटका बसला होता. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हापासून शेतकरी मदतीची याचना करत होते. अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे.

Eicher 188 Tractor । उत्तम मायलेज आयशर 188 ट्रॅक्टर 3 लाखांच्या रेंजमध्ये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *