Silk farmer । राज्यात रेशीम उद्योग (Silk industry) सर्वात मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. खरंतर रेशीम उद्योग हा कृषी आणि वनसंपत्तीवर आधारित उद्योग आहे. यामध्ये रोजगाराची क्षमता खूप जास्त आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कमी पाण्याच्या प्रदेशातही हमखास उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय अशी याची ओळख आहे. अनेकजण या व्यवसायकडे (Silk business) वळाले आहेत.
Samriddhi Yojana । आनंदाची बातमी! महिला समृद्धी योजनेतून मिळणार बचत गटांसाठी चार टक्के दराने व्याज
अशातच आता रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्यात रेशीम शेती (Sericulture) आणि त्यावर आधारीत उद्योगास चालना देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून, रेशीम उद्योगातून रोजगार निर्मिती करणे सरकारचे उद्दिष्ट आहे. रेशीम शेतकऱ्यांची संख्या वाढून त्यांना चालना मिळावी यासाठी रेशीम उद्योगाच्या प्रचार आणि प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत एक एकर रेशीम शेतीमधून शेतकऱ्याने किमान एक लाख रूपये वार्षिक उत्पन्न मिळवले तर त्यांना सन्मान केला जाणार आहे.
Amul Dairy । 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर
तसेच अशा शेतकऱ्यांचा रेशीम रत्न पुरस्कार दिला जाणार आहे. रेशीम उद्योगाच्या प्रचार आणि प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यातील लक्षाधीश रेशीम शेतकऱ्यांची कार्यशाळा व रेशीम रत्न पुरस्कार कार्यक्रमाकरिता प्रथम पुरस्कारासाठी ₹ ११,०००/-, द्वितीय पुरस्कारासाठी ₹ ७,५००/- व तृतीय पुरस्कारासाठी ₹ ५,०००/- प्रमाणे जिल्हानिहाय बक्षिस देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कार्यशाळा व रेशीम रत्न पुरस्कार कार्यक्रमाकरीता एकूण ₹ १५,९८,०००/ निधी प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत वितरीत आणि खर्च करण्यास याद्वारे मान्यता दिली आहे.
जाणून घ्या अटी
- जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी केलेला शेतकरी असावा.
- शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- रेशीम कोष उत्पादक शेतकरी असावा.
- प्रती १०० अंडीपुंजास किमान ६० कि.ग्रॅ. कोषाचे उत्पादनाबाबत रेशीम विकास अधिकारी यांनी प्रमाणित करावे.
- रेशीम शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या कोष विक्री केल्याबाबतची पावती जिल्हा रेशीम कार्यालयास जमा करावी.
- किमान १ एकर वर तुती/टसर लागवड केलेली असावी.
- कोष विक्रीतून वार्षिक उत्पन्न किमान १ लाख असावे.
- केंद्र शासन किंवा राज्य शासनामार्फत शासनाच्या योजनेच्या निकषाप्रमाणे रेशीम किटक संगोपनगृह बांधकाम केलेले असावे.
Animals Subsidy Scheme । आता बिनधास्त पाळा घोडे, गाढव; सरकार देतंय 50 लाखांपर्यंतचं अनुदान
अशी पार पडणार प्रक्रिया
१) रेशीम शेतकऱ्यांने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
२) जिल्हा रेशीम कार्यालयाने प्राप्त झालेल्या रेशीम शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी ७ दिवसांत करून घ्यावी.
३) जिल्हा रेशीम कार्यालय संबंधित जिल्ह्यातून प्राप्त अर्जातून पुरस्कारासाठी निवड करतांना वर्षात एकरी सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक असणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून प्रादेशिक रेशीम कार्यालयामार्फत रेशीम संचालनालयास शिफारस करून घ्यावी.
Success Story । युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! एक हेक्टर भाजीपाल्यातून होतेय लाखोंची कमाई
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ (तुतीची नोंद असलेला)
- लाभार्थ्याचा तुती लागवडीसह फोटो.
- लाभार्थ्यांच्या नावाचा ८ अ (खाते उतारा)
- पासपोर्ट साईज फोटो.
- आधारकार्ड.
- लाभार्थ्यांचा रेशीम किटक संगोपनगृहाचा फोटो.
- तक्यात नमुद कोष विक्री केलेल्या पावत्या (मूळ प्रती)
Agriculture News । शेताच्या बांधावर कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या तज्ञांचं मत