Crop Insurance । शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट उभे राहते. साहजिकच डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढल्याने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेता सरकार अनेक योजना राबवत असते. शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
राज्यातील शेतकरी अग्रीम पिकविम्याच्या (Insurance) प्रतीक्षेत होते. सरकारकडून आता तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे बळीराजाची यंदाची दिवाळी गोड होणार आहे, यंदा राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यात सप्टेंबर महिन्यात पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते.
Havaman Andaj । राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली होती. याच संदर्भात १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली होती. परंतु पीकविमा कंपनीने हरकत घेतली. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत विमा कंपन्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली.
Crop Insurance । आधार लिंक नसेल तर तुम्हालाही मिळणार नाही पिकविमा भरपाई, जाणून घ्या महत्त्वाचा नियम
पीकविमा कंपनीने ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर केला आहे. कंपन्यांच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. बीड जिल्ह्यात तब्बल ७ लाख ७० हजार अर्जदारांना एकूण २४१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या