Sugarcane Workers । सध्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. परंतु ऊसाला (Sugarcane) अपेक्षित दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. जोपर्यंत चांगला दर (Sugarcane Rate) मिळत नाही तोपर्यंत ऊस कारखान्यात जाऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. अखेर यावर तोडगा निघाला आहे. मात्र आता साखर कारखान्यांना (Sugar Factories) मोठा धक्का बसला आहे.
Farmers Products । नादच खुळा! शेतकऱ्यांनो, आता आपला शेतमाल थेट मॉलमध्ये विकला जाणार
यंदा राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या खूप कमी झाली आहे. काही साखर कारखान्यांना दैनंदिन उसाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने गाळप होत नाही, असे पाहायला मिळत आहे. मजुर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अशी परिस्थिती ओढवली आहे, असे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा तुमच्या कांद्याची किंमत, होईल फायदाच फायदा
साखर कारखानदारांवर दुहेरी संकट
एकीकडे उसाची टंचाई त्यात आता दुसरीकडे मजुरांची कमतरता जाणवत असल्याने राज्यातील साखर कारखानदारांवर दुहेरी संकट आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदा फक्त जिल्ह्यातच नाही, तर राज्यात बहुतेक सर्वच साखर कारखान्यात विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळे दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली असून साखर कारखान्यांना मोठा धक्का बसला आहे.
Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…
पाथर्डी, बीड या भागातील जास्त ऊसतोड मजूर असतात. मात्र मागील पाच ते सात वर्षांत तोडणी मजुरांची संख्या खूप कमी झाली आहे. कारण या भागातील तरुण पिढी कोयता हाती न घेता नोकरी, व्यवसाय करू लागली आहे. त्यामुळे यावर्षी ऊस तोडणी मजुरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जळगाव, धुळे, हिंगोली, यवतमाळ भागातून ऊस तोडणी मजूर टोळ्या कार्यरत आहेत.
कामगारांचा संप
दरम्यान, गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी विविध मागण्यांच्या मुद्यावरुन ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारला होता. हार्वेस्टरप्रमाणेच टनाला 400 रुपये द्या, अशी त्यांची महत्त्वाची मागणी होती. ऊसतोड कामगारांच्या या संपाला शेगाव-पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी पाठिंबा दिला होता.