Unseasonal Rain

Unseasonal Rain । पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

हवामान

Unseasonal Rain । रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपीट (Hail Storm) आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हिवाळ्याच्या दिवसात राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आज आणि उद्याही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे.

Sugarcane Workers । साखर कारखान्यांना मोठा धक्का! ऊसतोडणी मजुरांची घटली संख्या

दरम्यान, विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू असून हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय इतर भाजीपाल्याचेही खूप नुकसान झाले आहे.

Farmers Products । नादच खुळा! शेतकऱ्यांनो, आता आपला शेतमाल थेट मॉलमध्ये विकला जाणार

अवकाळी पावसाची हजेरी

तसेच मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस (Maharashtra Unseasonal Rain) झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट झाली आहे. येथील लोणी, धामणी, खडकवाडी गावातील कांद्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मंचर परिसरात देखील वादळीवा-यासह पावसाची दमदार बँटीग झाली असून मुंबईमध्ये पावसाचे वातावरण कायम आहे. त्याशिवाय नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा तुमच्या कांद्याची किंमत, होईल फायदाच फायदा

मिरचीचे नुकसान

जळगाव जिल्ह्यादेखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास २० ते २५ हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने ३० टक्के मिरची खराब होऊ शकते.

Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…

कांदा उत्पादक शेतकरी निराश

अशातच आता उन्हाळा कांदा संपून लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झाली आहे. परंतु अवकाळी पावसाने आणि गारपिटीने पुन्हा एकदा चांगलेच झोडपल्याने कांद्याचे खूप नुकसान झाले आहे. मागील तीन महिन्यापासून दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करून वाढवला होता. परंतु आता या कांद्याचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी निराश झाला आहे.

Jalyukta Shivar Yojana । बळीराजासाठी आनंदाची बातमी! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *