Onion Price

Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा तुमच्या कांद्याची किंमत, होईल फायदाच फायदा

कृषी सल्ला

Onion Price । कांदा हे स्वयंपाकघरातील महत्त्वाची वस्तू आहे. कांद्यामुळे भाज्यांची चव वाढते. शिवाय कांद्याचा वापर सौंदर्यासाठीही केला जातो. साहजिकच मागणी जास्त असल्याने शेतकरी दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. परंतु, प्रत्येक वर्षी कांद्याला योग्य दर मिळतोच असे नाही. दर न मिळाल्याने कांदा शेतकरी फेकून देतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कांद्याचे दर (Onion Price Falls Down) पडले आहेत.

Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…

काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर (Onion Rate) वाढले होते. परंतु सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पुन्हा कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. कांदा उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न यावर अवलंबून असते. यावर्षी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे.

Jalyukta Shivar Yojana । बळीराजासाठी आनंदाची बातमी! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सुकविलेला कांदा

कांदा नाशवंत असल्याने त्याची हाताळणी व्यवस्थित करावी लागते. कांदा सुकविण्यासाठी प्रतवारी करण्यात आलेला समान आकाराचा कांदा असेल तर यांत्रिक पध्दतीने त्याची आवरणे काढून काप करतात. लघुउद्योग स्तरावर हाताने प्रक्रिया करतांना सर्वात अगोदर कांद्याच्या देठ आणि मुळाकडील काही भाग कापून टाका. त्यानंतर त्यावरील वाळलेली (Onion Dehydration) आवरणे काढून कांद्याचे ०.५ ते १ मि. मी. जाडीच्या यंत्राचे मदतीने किंवा चाकूने उभे काप करा.

Havaman Andaj । पुढील ३-४ तास महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; या ठिकाणी गारपिटीचा इशारा

पुर्वप्रक्रिया 

तसेच कांद्याचे काप २ टक्के तुरटीच्या द्रावनात १ तास बुडून ठेवा. कांद्याचे काप ०.०५ टक्के पोटॅशियम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात १० मिनिट बुडून पुर्व प्रक्रिया कराव्या. असे केल्याने पुर्व प्रक्रियेमुळे वाळलेला कांद्याचा रंग जास्त काळ टिकतो. कांद्याच्या पोषण गुणवत्तेवरही चांगला परिणाम पाहायला मिळतो. वाळवणी यंत्रात सुकवण्यासाठी १२ ते २० तासांचा वेळ लागतो. लाल किंवा गुलाबी कांद्यांचा वापर करत असताना ५ टक्के मिठाच्या द्रावणात २ टक्के कॅल्शीयम क्लोराईड मिसळून त्यात कांद्याचे काप १० ते १५ मिनीटे बुडवून नंतर सूकवील्यास रंगात सुधारणा दिसून येते.

Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव

तुम्ही या कांद्याचा वाळलेला किस, पावडर, तुकडे, चकत्या तयार करू शकता. वाळलेला कांदा ३००-४०० गेजच्या पॉलीथीन पिशव्यात भरुन हवाबंद करा. हवाबंद केलेला वाळलेला कांदा सहा महिन्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहतो. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही, त्यामुळे त्यांचा कांदा वेळेपूर्वीच खराब होतो. या पद्धतीने तुम्ही कांद्याची हाताळणी केली तर त्याचा फायदाच फायदा होईल.

Pakistan Inflation । पाकिस्तानमध्ये भयानक महागाई, एलपीजी गॅसची किंमत 3,000 रुपयांच्या पुढे, मैदा, चहा, तांदळाचे भाव गगनाला भिडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *