Insurance

Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…

शासकीय योजना

Insurance । शेतकरी हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार पिकांची लागवड करत असतात.परंतु यात जेवढे अधिकचे उत्पन्न यात निघते तेवढ्याच प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागतो. म्हणून पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिले तर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होते. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने पीक विमा (Crop Insurance) योजनेची सुरुवात केली आहे.

Jalyukta Shivar Yojana । बळीराजासाठी आनंदाची बातमी! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

विमा काढून देखील नुकसानभरपाई मिळत नाही, अशी शेतकरी तक्रार करत असतात. हे लक्षात घ्या की ही रक्कम विमा (Crop Insurance Schemes) संरक्षित शेती क्षेत्र आणि रक्कम यावर ठरत असते. अर्जदारांकडून योजनेत काही १ चौरस मीटर, गुंठ्याचा शंभरावा भाग, दहावा भाग क्षेत्राचाही विमा काढण्यात आला आहे. असे ६ हजार १७५ अर्जदार पडताळणीत समोर आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांची विमा संरक्षित रक्कम १०० रुपयांपेक्षाही कमी आहे.

Havaman Andaj । पुढील ३-४ तास महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; या ठिकाणी गारपिटीचा इशारा

सरकारकडून निर्णय जारी

त्याशिवाय एक हजारांपेक्षा कमी विमा संरक्षित रक्कम अर्जदारांची संख्या सव्वा लाख इतकी आहे. असे असल्याने या अर्जदारांना नुकसानभरपाई एक हजारांपेक्षा कमी मिळत असल्याने रक्कम कमी मिळेल. दरम्यान, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम कमी मिळत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर राज्य सरकारकडून (State Govt) २०१९ मध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Rajma Cultivation । राजमा लागवड करून अल्पावधीत मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या लागवडीची पद्धत

मिळाली ५० हजारांपर्यंत भरपाई

पीक कापणी प्रयोग, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पेरणी न होणे आणि काढणी पश्चात नुकसान या पाच प्रकारांसाठी पीक विमा दिला जातो. विमा संरक्षित रकमेच्या ५० टक्के भरपाई निश्चित झाले तर ४ रुपयांच्या विमा संरक्षित रकमेनुसार भरपाई १ रुपया येते. त्यामुळे सरकारच्या २०१९च्या शासन निर्णयाचा १ हजार रुपयांचा निकष लागू होत नाही. काही शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत नुकसानभरपाई मिळाली आहे. असे असूनही काही अर्जदारांमुळे योजना (Government Schemes) बदनाम होत आहे असे कृषी विभागातील सूत्रांचे मत आहे.

Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव

दरम्यान, नुकतीच मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट आले असून नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रीम रक्कम नुकसानग्रस्तांना मिळाली आहे. अंतिम पीक काढणी अहवालानंतर उरलेली ७५ टक्के रक्कम मिळेल. तर काहींनी गुंठ्याच्या शंभराच्या भागाचा विमा काढला असून काहींनी गुंठ्याचा दहावा भाग, अर्ध्या गुंठ्याचा विमा काढला आहे.

Pakistan Inflation । पाकिस्तानमध्ये भयानक महागाई, एलपीजी गॅसची किंमत 3,000 रुपयांच्या पुढे, मैदा, चहा, तांदळाचे भाव गगनाला भिडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *