Government schemes । शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागल्याने साहजिकच त्यांच्यावर आर्थिक संकट येते, अनेक शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर देखील उपासमारीची वेळ येते. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकार विविध योजनांना (Government schemes for farmer) सुरुवात करत असते. ज्याचा या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो.
Leopard Attack । आईवडील ऊस तोडण्यात रमले, बिबट्याने चिमुरडीवर केला हल्ला; पोटचा गोळा डोळ्यादेखत गेला
सरकारची अशीच एक धमाकेदार योजना (Schemes for farmer) आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता पडीक जमिनीवर 100% अनुदान देण्यात येत आहे. सरकार आता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य अभियान राबवत आहे. योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना वैरण लागवडीसाठी अनुदान (Subsidy) उपलब्ध करून देत आहे.
वैरण लागवडीसाठी वैरण बियाणे शंभर टक्के अनुदान (Subsidy for farmer) दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत हे अभियान राबवण्यात येत आहे. १०० टक्के अनुदानावर प्रती लाभार्थी १५०० रुपये मर्यादित वैरण बियाणे दिले जाणार आहे. आता खरीप हंगामात वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गवती कुरणक्षेत्र, गायरान आणि पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी वैरण बियाणे देण्यात येणार आहे.
Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता उन्हाळी हंगामात अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे
या ठिकाणी करा अर्ज
पशुपालकांना वैरण लागवडीसाठी 100 टक्के अनुदानावर वैरण बियाण्याचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समिती स्तरावर अर्ज करावा लागणार आहे. उपलब्ध अनुदानानुसार पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज पाठविले जाणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिली आहे.
जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्र
या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याकडे सातबारा, आठ अ उतारा गरजेचा आहे. लाभार्थ्याकडे वैरण लागवडीसाठी पडीक, गवती कुरणक्षेत्र जमीन असावी लागते.
Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण