Crop Disease

Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण

कृषी सल्ला

Crop Disease । गहू (Wheat) हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. मोठ्या प्रमाणावर भारतात गव्हाची लागवड करतात. गव्हाच्या अनेक जाती आहेत. विविध जातींनुसार गव्हाचे पीक येते. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड (Wheat Crop Cultivation) केली आहे. येत्या काही दिवसात गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल. पण सध्या शेतकरी गव्हाच्या किडीमुळे (Wheat Crop Disease) खूप हैराण झाले आहेत.

Government Schemes । क्या बात है! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 37500 रुपये, कसं ते जाणून घ्या

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काही वर्षांपासून गव्हाच्या पिकावर (Wheat Crop) किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. रब्बीत लागवड केलेल्या गव्हाच्या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव असल्याचे समोर आले आहे. ही कीड गव्हाच्या ओंब्यांवर दिसून आली आहे. त्यामुळे शेतकरी काळजीत पडले आहेत. शिवाय फुलोऱ्यात तर वाढीच्या अवस्थेत कीड पाहायला मिळत आहे.

Blue Fin Tuna Fish । ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा मासा…कोटींच्या घरात किंमत; माहिती वाचून व्हाल थक्क

गहू ओंब्या आणि फुलोऱ्यात आहे, तेथे अळ्या दिसत आहेत. ही अळी खोडकिडी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. गव्हाच्या पिकावर आजवर फारशी कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत नव्हता. पण सध्या या किडीमुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणामाचा धोका निर्माण झाला आहे.

Kisan Credit Card । सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय कमी व्याजदरात लाखो रुपयांचं कर्ज, जाणून घ्या योजना

असे मिळवा नियंत्रण

ही अळी खोडाच्या आत शिरून आतील भाग खायला सुरुवात करते. त्यामुळे शेंडा/पोंगा वाळतो आणि फुलावर असताना प्रादुर्भाव झाला तर ओंब्या वाळतात, दाणे भरत नाहीत. या किडीच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम कीटकनाशक नाही. आता तुम्ही गहू पिकावर मावा किड नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशक क्विनॉलफॉसची फवारणी करून या किडीवर नियंत्रण मिळवू शकतो.

Agricultural Exhibition । ऐकावे ते नवलच! तंत्रज्ञानाचा डबल फायदा, टोमॅटोच्या झाडाला बटाटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *