Solar pump

Solar Scheme । शेतकरीवर्गासाठी आनंदाची बातमी! मिळणार ९५ टक्के अनुदान, जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया

शासकीय योजना

Solar Scheme । कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सरकारकडून वेगवेगळ्या योजना (Government Schemes) देखील राबविल्या जातात. ज्याचा देशभरातील अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता याव तसेच शेतीला पाणी देता यावं, यासाठी पंतप्रधान कुसुम सोलार योजना आणली आहे.

Government Schemes । ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड! मिळणार 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ

शेतकऱ्यांना या योजनेतून सौर पंप देण्यात येतात. तुम्ही kusum.mahaurja.com/solar या वेबसाइटवर जाऊन (Solar Scheme Application) अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९५ टक्के अनुदान मिळत आहे. काय आहे सरकारची ही खास योजना? त्यासाठी कोणत्या अटी आहेत? जाणून घेऊयात याबद्दल माहिती. (Solar Scheme Informtion)

Success Story । मेहनतीच्या जोरावर कोरडवाहू जमिनीत पिकवले सोने, कशी केली या शेतकऱ्याने सुरुवात, एकदा वाचाच

पंपासाठी जमिनीच्या अटी

अडीच एकरपर्यंत जमीन असणाऱ्यांना – ३ एचपी पंप
अडीच ते 5 एकरपर्यंत जमीन असणाऱ्यांना – ५ एचपी पंप
५ एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना – ७. ५ एचपी पंप

Namo Shetkari Yojana । तुम्हालाही घेता येणार 12 हजारांचा लाभ, पण मान्य करावी लागेल ‘ही’ अट

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक फोटो
  • सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक
  • सामायिक सातबारा असल्यास 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! कॅन्सरग्रस्त पुणेकराने केली केशराची यशस्वी शेती, वर्षाला मिळतेय लाखोंचे उत्पन्न

पात्रता

  • शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
  • अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Namo Shettale Abhiyan । पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राबवली जाणार नवीन योजना, शेततळ्यासाठी मिळणार पैसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *