Success Story । शेती म्हटलं की संकटे आलीच. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यात प्रत्येकवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव मिळतोच असे नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना राबवत असते. दरम्यान, आता अनेकजण पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेऊ लागले आहेत. सीताफळ (Custard Apple) हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे पीक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे येथील नवनाथ मल्हारी कसपटे यांनी कोरडवाहू जमिनीतून सीताफळाचे (Cultivation of Custard Apple) यशस्वी उत्पादन घेतले आहे. त्यांचे आई-वडील शिकलेले नाहीत. त्यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांची आई इयत्ता सहावीत असतानाच वारली. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनीतून जेमतेम उत्पादन मिळायचे. अशातच १९७२ चा दुष्काळ पडल्यावर त्यांनी सहा महिने खडी फोडून दहावीपर्यंत शिक्षण घेतले.
Namo Shetkari Yojana । तुम्हालाही घेता येणार 12 हजारांचा लाभ, पण मान्य करावी लागेल ‘ही’ अट
अशी केली सुरुवात
परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी शिक्षण सोडले आणि शेती करू लागले. दाभोळकर सरांचे व्याख्यान एकूण त्यावर अभ्यास करायचे. १९८५ ला त्यांनी शेतात बोअरवेल खोदून पाण्याचा प्रश्न मिलटवला. त्यांनी शेतीत योग्य नियोजन करून पपई, सीताफळ, बोर पिकं घेण्यास सुरुवात केली. त्यांना अनिल दबडे व शरद हवेली यांनी द्राक्ष पिकाविषयी मार्गदर्शन केले.
पुरस्काराने सन्मानित
त्यांनी द्राक्ष पिकवून २००१ मध्ये ती महाग्रेप्सने लंडनला पाठवली. १९९७-९८ मध्ये ‘सर्वाधिक द्राक्षनिर्यातदार’ असा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ते २०११ पर्यंत द्राक्षनिर्यात करत होते. पुढे पाणी कमी पडल्याने त्यांनी सीताफळाची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी २००१ मध्ये ‘एन एम के १ उर्फ गोल्डन’ ही सीताफळाची जात विकसित केली आहे. यामुळे त्यांना एकरी आठ ते बारा टन उत्पन्न मिळत आहे.
Sharad Pawar । मोठी बातमी! दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर
त्यांनी महाराष्ट्र सीताफळ संघ’ स्थापन केला असून त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी देशातले सीताफळातील पहिले पेटंट मिळवले आहे. सीताफळ संशोधनासाठी प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. शिवाय त्यांनी ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर मधुबन या नर्सरीची निर्मिती देखील केली आहे. त्यांच्या या मेहनतीमुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.