Success Story

Success Story । राजकारण सोडून 65 वर्षीय शेतकरी शेतीतून कमावतोय 40 लाख, कसे केले नियोजन? जाणून घ्या…

यशोगाथा

Success Story । आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकरी शेती करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. जर जास्त नफा कमावयाचा असेल तर योग्य ते नियोजन आणि मेहनत गरजेची आहे. अलीकडच्या काळात आधुनिक पिके घेतल्याने जास्त फायदा होत आहे. त्यामुळे तरुणवर्ग देखील नोकरी सोडून शेती करू लागले आहेत.

Onion Price Hike । कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! कांद्याच्या दरात विक्रमी वाढ

राजकारण सोडून शेतीला सुरुवात

शेतीसोबत शेतकरी जोडव्यवसाय करत आहेत. बिहारच्या पाटणा येथील शेतकरी गिरेंद्र शर्मा यांनी कुक्कुटपालन (Poultry farming) आणि फलोत्पादनातून (Horticulture) वर्षाला 40 लाख रुपयांची कमाई करत आहेत. त्यांनी आपल्या शेतात चंदनाच्या झाडांची लागवड (Plantation of sandalwood) केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी राजकारण सोडून शेतीला सुरुवात केली आहे आणि त्यातून त्यांना सध्या लाखो रुपयांची कमाई करता येत आहे.

Havaman Andaj । ‘या’ राज्यांत पडणार येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

गिरेंद्र शर्मा यांनी 1990 सालापासून शेती करायला सुरुवात केली. औषधी शेतीच्या सहाय्याने शेती करत असलेले शर्मा मागील आठ वर्षांपासून कुक्कुटपालन आणि मागील सहा वर्षांपासून बागायती शेती करतात. त्यांच्या चार एकर क्षेत्रावर बागा आहेत. यात चंदन, आगर, आंबा, बांबूची झाडांची लागवड केली आहे. चार पोल्ट्री फार्म आणि वॉर्मिंग कंपोस्ट व्यवसाय आहे. बिहारच्या मातीवर आगराचे झाड लावणारा ते राज्यातील पहिला शेतकरी अशी त्यांची ओळख आहे.

Havaman Andaj । महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

त्यांनी औषधी वनस्पती म्हणून लेमन ग्रास, मेंथा, पालमा रोझा आणि तुळस यांची लागवड केली आहे. सध्या ते पाच हजार कोंबड्यांचे चार पोल्ट्री फार्म चालवत असून त्यातून त्यांना महिन्याला चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक पद्धतीने भात आणि गव्हाची लागवड केली आहे. त्यांना सोशल मीडियाची त्यांना शेतीत खूप मदत झाली आहे.

Government Schemes । ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड! मिळणार 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *