Success Story । तरुणवर्गाने देखील शेतीचे महत्त्व समजून शेती (Agriculture) करण्यास सुरुवात केली आहे. शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भारत हा एक कृषी प्रधान देश (Agricultural country) आहे. शेतकऱ्यांच्या प्रगती शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. शेती व्यवसायात शेतकऱ्यांची चांगली प्रगती व्हावी, शेती उत्पन्न हे दुपटीने वाढावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना (Agricultural schemes) राबवत असते.
Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी
एका तरुण शेतकऱ्याने अनोखा प्रयोग केला आहे. ज्याच्या माध्यमातून तो वर्षाला 8 ते 9 लाखांची कमाई करत आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे ते राहतात. त्यांनी सेंद्रीय गुळाचा (Organic jaggery) यशस्वी प्रयोग केला आहे. विशेष बाब म्हणजे ते नैसर्गिकरित्या ऊस पिकवतात आणि नंतर स्वतः गूळ तयार करतात. त्यामुळे सध्या त्यांची सगळीकडे चर्चा सुरु आहे. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल. (Successful experiment of organic jaggery)
Scheme for Wine Industry । वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन, सरकारने सुरु केली खास योजना
सेंद्रिय गुळ
ते बाजारात उसाची विक्री करत नाही. तर त्याऐवजी ते काळेसरवर सेंद्रिय गूळ (jaggery) तयार करतात. यासाठी त्यांनी आठ कर्मचारी ठेवले आहेत. दिल्ली एनसीआर, कोलकाता आणि राजस्थानमध्ये त्यांनी तयार केलेल्या सेंद्रिय गुळाचा पुरवठा केला जातो. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘पीएम किसान एफपीओ स्कीम’ अंतर्गत नोंदणी केली आहे.
Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल
गुळाचे अनेक प्रकार
ते औषधी गूळ, दुसरा ड्रायफ्रुट्स गूळ आणि तिसरा साधारण गूळ तयार करतात. या गुळामध्ये ते अंबाडीच्या बिया आणि खरबूजाच्या बिया घालून औषध तयार करतात. ज्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. तसेच गुळात बदाम, खजूर आणि शेंगदाणे टाकून सुका मेवा तयार करण्यात येतो. ज्याची बाजारात 180 रुपये ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत किंमत आहे.
Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी
याबाबत शेतकरी विजय यांनी माहिती दिली आहे. पूर्वी ते फक्त ऊसाची शेती करत होते. त्यामुळं त्यांना उत्पन्न कमी मिळत होते. त्यावेळी त्यांना सेंद्रिय गूळ बनवण्याची कल्पना आली. ते आता सेंद्रिय गूळ बनवून प्रत्येक वर्षाला साधारण 8 ते 9 लाख रुपये कमावतात. सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळत असल्याने तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Sugarcane Labor Unions । उसतोड मजुरांसाठी आनंदाची बातमी! उसतोडणी दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ