Success Story । शेतकरीवर्ग आता शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. सध्या नोकरी मिळणे आणि ती टिकवणे खूप जिकरीचे काम बनले आहे. महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षित तरुणदेखील आता नोकरी सोडून शेती करू लागला आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्याने भरघोस उत्पादन मिळत आहे.
Maize Tur Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मका आणि तुरीच्या किमतीत मोठी वाढ
शिवाय पारंपरिक पिकांमध्येही विविध प्रयोग होऊ लागले आहेत. सध्या एका बाजरीच्या (Millet) पिकाची चांगलीच चर्चा होत आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकऱ्याच्या शेतात चार फूट लांबीचे कणीस लागले आहे. राहुल वाले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या बाजरीला तीन ते चार फुटांपर्यंत कणीस लागले असल्याने या पिकाची (Cultivation of Millet) चांगलीच चर्चा होत आहे.
Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर
मिळते तिपटीने उत्पादन
राहुल वाले यांनी राजस्थानहून पोस्टाने गावठी बियाणे आणले होते. एक हजार रुपये किलो दराने बियाणे आणले होते. सांगोला तालुक्यात यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाला. दमदार पावसाने बाजरीचे पीक बहरले आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ 20 गुंठ्यात ही बाजरीचे पीक घेतले आहे. नियमित केल्या जाणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने उत्पादन हे पीक देते, असा दावा वाले यांनी केला.
Unseasonal Rain । पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
तुर्की जातीचे बियाणे
हे तुर्की जातीचे बाजरी पीक आहे. सर्वसाधारण बाजरी आणि तुर्की जातीचे बाजरीमध्ये खूप फरक आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांना 20 गुंठ्यात अर्धा किलो बाजरीच्या बियाण्याची गरज भासली. तुर्की जातीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असते. त्यामुळे ही बाजरी मूळव्याध आणि शुगर असणाऱ्या नागरिकांना फायदेशीर ठरू शकते.
Sugarcane Workers । साखर कारखान्यांना मोठा धक्का! ऊसतोडणी मजुरांची घटली संख्या
दरम्यान, चार फूट लांब बाजरीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय बनत आहे. इतर शेतकरी त्यांच्या शेतात जाऊन बाजरीचे पीक पाहत आहेत. शेतकरीवर्ग पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे फिरला असताना, आता पारंपरिक पिकांतही विविध प्रयोग होऊ लागले आहे. त्यांना या पिकामधुन भरघोस उत्पादन मिळेल, असा दावा आहे.
Farmers Products । नादच खुळा! शेतकऱ्यांनो, आता आपला शेतमाल थेट मॉलमध्ये विकला जाणार