Maize Tur Market

Maize Tur Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मका आणि तुरीच्या किमतीत मोठी वाढ

Blog

Maize Tur Market । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सतत बसत असतो. त्यात शेतमालाला निश्चित हमीभाव मिळत नाही. अनेकदा शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल शेतमालाची भावात विक्री करावी लागते. यंदा राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. याचा परिणाम पिकांवरही खूप झाला आहे.

Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर

मका किंमत

अशातच आता मका (Maize Price) आणि तुरीच्या किमतीत (Tur Price) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. NCDEX मधील रबी मक्याच्या स्पॉट किमती मागील आठवड्यात २,१५७ रुपयांवर आल्या होत्या. या आठवड्यात त्यात ०.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्या २,१७० रुपयांवर आल्या आहेत. फ्युचर्स किमती रु. २,२१० वर आल्या असून फेब्रुवारी फ्युचर्स किमती रु. २,२०८ वर आल्या आहेत. सध्या मक्याचा हमीभाव रु. २,०९० (Maize Price Hike) आहे.

Unseasonal Rain । पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

तूर किंमत

किमतीबद्दल बोलायचे झाले तर तुरीची स्पॉट किमत (अकोला) या आठवड्यात १.७ टक्क्यानी झाली आहे, त्या रु. १०,२६८ वर आल्या आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० असून मागील दोन महिन्यात तुरीच्या किंमती (Tur Price Hike) खूप वाढल्या होत्या; परंतु त्या सध्या स्थिर झाल्याचे दिसत आहेत.

Sugarcane Workers । साखर कारखान्यांना मोठा धक्का! ऊसतोडणी मजुरांची घटली संख्या

हरभरा किंमत

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या आठवड्यात ०.४ टक्क्यांनी घसरल्या आहे. त्यांनतर त्या रु. ६,१५० वर आल्या आहेत. सध्याचा हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० इतका आहे.

Farmers Products । नादच खुळा! शेतकऱ्यांनो, आता आपला शेतमाल थेट मॉलमध्ये विकला जाणार

मूग किंमत

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,७०० वर आली असून सध्याचा मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ इतका आहे.

Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा तुमच्या कांद्याची किंमत, होईल फायदाच फायदा

सोयाबीन किंमत

मागील आठवड्यात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,३५३ वर आली होती मात्र ती या आठवड्यात ०.९ टक्क्यांनी घसरली आहे. रु. ५,३०३ वर आली आहे. सध्या सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० इतका आहे.

Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *