Farmers Products

Farmers Products । नादच खुळा! शेतकऱ्यांनो, आता आपला शेतमाल थेट मॉलमध्ये विकला जाणार

बातम्या

Farmers Products । महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात येणाऱ्या वस्तू आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना जिल्हास्तरावर हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. बऱ्याचदा विक्रीसाठी योग्य ठिकाण न मिळाल्याने शेतमाल (Agriculture Products) तसाच शेतात कुजून जातो. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु आता ही समस्या मिटणार आहे.

Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा तुमच्या कांद्याची किंमत, होईल फायदाच फायदा

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. १८ व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शंभूराज देसाई यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. “नवी मुंबई, ठाणे, वाशी या ठिकाणी मॉल (Agriculture Products Sale In Mall) आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्याने सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…

प्रदर्शनाची संकल्पना

पुढे देसाई म्हणाले की, “शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान पाहायला आणि अनुभवयला यावे. या संकल्पनेतून स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांनी कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची संकल्पना साकारण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवनवीन बदल, नवनवीन तंत्रज्ञान आणि वैविध्यपूर्ण उपक्रमाची माहिती सहज उपलब्ध करून दिली.”

Jalyukta Shivar Yojana । बळीराजासाठी आनंदाची बातमी! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

बांबू लागवडीला प्रोत्साहन

“सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या उत्पादित मालाला योग्य कृषी भाव देण्यासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक विविध योजना राबविल्या जाणार आहेत. कृषी विभागाला सरकार जास्त गतिमानता देत आहे. कृषी यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवले जात आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण मिळत आहे. पाण्याची कमतरता असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर बांबू लागवड केली तर त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. यासाठी बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.”

Havaman Andaj । पुढील ३-४ तास महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; या ठिकाणी गारपिटीचा इशारा

दरम्यान, “आज शेतात माल पिकत असला तरी तो विकायला जागा मिळत नाही. ग्रामीण भागात जे उत्पादन होते ते गुणवत्तेच्या जोरावर शहरी बाजारपेठेत चांगल्या दराने विकावी, अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे असे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. कराड येथे होत असणारे राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा लाभ तब्बल आठ ते दहा लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Rajma Cultivation । राजमा लागवड करून अल्पावधीत मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या लागवडीची पद्धत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *