Havaman Andaj । राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडत असणाऱ्या पावसामुळे (Heavy Rain) वातावरणातही गारवा जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे खूप नुकसान होत आहे. अशातच आता विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे.
Success Story । चर्चा ती फक्त चार फूट लांब बाजरीच्या कणसाची! गावठी बियाण्याने केली कमाल
हवामान खात्याने आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट (Weather Update) दिला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक, जळगाव आणि पालघर या जिल्ह्यांत देखील मुसळधार पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे.
Maize Tur Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मका आणि तुरीच्या किमतीत मोठी वाढ
परंतु, परवापासुन राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. कारण उद्यापासून पाऊस विश्रांती घेणार असल्याचे मत हवामान खात्याचे आहे. दरम्यान, नैऋत्य अरबी समुद्रापासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाच्या हवेचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्याला अवकाळी पावसाने (Rain in Maharashtra) झोडपून काढले आहे.
Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर
पावसाचा येलो अलर्ट जारी
हवामान खात्याने सोलापूर, जालना, बीड, अहमदनगर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अकोला, अमरावती इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे खूप नुकसान होत आहे. खरीप हंगामातही पिकांचे नुकसान झाले होते. आताही नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
Unseasonal Rain । पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
मिरचीचे नुकसान
जळगाव जिल्ह्यादेखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास २० ते २५ हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने ३० टक्के मिरची खराब होऊ शकते.
Sugarcane Workers । साखर कारखान्यांना मोठा धक्का! ऊसतोडणी मजुरांची घटली संख्या