Onion Export

Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी

बातम्या

Onion Export । कांद्याने (Onion) यंदाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. परंतु, केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यात बंद (Onion export ban) करण्याचा निर्णय घेतला. निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर (Onion rate) कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि विरोधक सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

Scheme for Wine Industry । वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन, सरकारने सुरु केली खास योजना

भारताकडे इंडोनेशियाने केली मागणी

दरम्यान, इंडोनेशियाला (Indonesia) अमेरिका, भारत (India) आणि न्यूझीलंड हे देश कांद्याची निर्यात करतात. अशातच आता इंडोनेशियाने भारताकडून 900,000 टन कांद्याची निर्यात करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती आहे. भारताने मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट महिन्यात कांद्यावर 40% निर्यात कर (40% export tax on onion) लादल्यानंतर आणि ऑक्टोबर महिन्यात निर्यात मूल्य $800 प्रति टन केल्यावर, देशांतर्गत पुरवठा आणि पिकांच्या तुटवड्यामुळे किंमती स्थिर ठेवण्यासाठी इंडोनेशिया मार्फत ही विनंती केली आहे.

Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल

कांद्याच्या उच्च किमतींमुळे डिसेंबरमध्ये संपूर्ण निर्यात बंदी घालण्यात आली. भारताने कांद्यावर निर्यात बंदी घातल्यानंतर, इंडोनेशियातील व्यापारी आणि आयातदार भारतीय कांद्याची निर्यात व्हावी यासाठी विनंतीप्रत मागणी करत असल्याची माहिती भारत सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली आहे. त्या माहितीनुसार इंडोनेशियाकडून 900,000 टन कांद्याची मागणी आहे.

Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबर महिन्यात, इंडोनेशियाला भारताने 36,146 टन कांद्यासह 1.4 दशलक्ष टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. 2023 च्या आर्थिक वर्षात याच कालावधीत, भारताने 1.35 दशलक्ष टन किचन स्टेपलची निर्यात केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि निर्यातदारांच्या आकडेवारीनुसार, 2023 च्या आर्थिक वर्षात भारताच्या कांद्याची एकूण निर्यात 2.5 दशलक्ष टन इतकी होती, ज्यात इंडोनेशियाला 116,695 टनांचा समावेश होता.

Sugarcane Labor Unions । उसतोड मजुरांसाठी आनंदाची बातमी! उसतोडणी दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ

कमी झाले कांद्याचे दर

दरम्यान, निर्यातीवर बंदी घातल्यापासून कांद्याची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यातबंदीमुळं कांद्याची येत्या काळातही आणखी घसरण होणार असल्याचे बोलले जात आहे. दर आणखी पडल्याने शेतकऱ्यांना आणखी तोटा सहन करावा लागणार आहे. जर असे झाले तर शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट आणखी कोलमडू शकते. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Havaman Andaj । महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *