Crop Insurance । शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट देखील उभे राहते. साहजिकच डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढल्याने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेता सरकारने योजना (Government Schemes) राबवायला सुरुवात केली आहे. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो.
Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या
दरम्यान, प्रधानमंत्री खरीपपीकविमा (Insurance) योजनेत आता नुकसानभरपाईस पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम देत असताना त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना आळा बसणार आहे. लवकरच नुकसानभरपाईची 25 टक्के अग्रिम रक्कम याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
Sandalwood Farming । शेतकऱ्यांनो करा ‘हे’ काम, तुम्हालाही चंदन लागवडीतून करता येईल करोडोंची कमाई
आधार क्रमांक बंधनकारक
आधार क्रमांक (Aadhar Link) बंधनकारक केल्यानंतर 25 टक्के अग्रिम रक्कम नियमानुसार खात्यात जमा होईल. पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेत राज्यातील शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाला जोडण्यात आले आहे. हेच शेतकरी पंतप्रधान खरीपपीकविमा योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना अडचण येणार नाही.
Krushi Yojna । मागेल त्याला योजनेत लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? फक्त एकाच क्लिकवर तपासा
..तर मिळणार नाही लाभ
त्यामुळे आता जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. प्रत्यक्ष लाभार्थ्याला नुकसानभरपाईचा लाभ मिळावा यासाठी आता कृषी विभागाकडून आधार क्रमांक जोडलेले बँक खाते ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Agriculture News । ऐकावं ते नवलंच! केवळ ४ तासात शेतकरी बनला कोट्याधीश, कसं ते जाणून घ्या