Grapes Export । सध्या शेतकरी जास्त नफा मिळवण्यासाठी फळबागांची (Orchards) लागवड करत आहेत. इतर पिकांपेक्षा फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येत आहेत. अनेक शेतकरी द्राक्ष लागवड (Grape cultivation) करतात. यंदा मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. कारण यंदा पावसामुळे द्राक्ष बागांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर
अजित पवारांनी दिले आश्वासन
राज्यात सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना त्यांचा माल निर्यात करताना समस्या येत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी द्राक्ष निर्यातीबाबत मोठे विधान केले आहे. “द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यासंबंधित असणारे सर्व प्रश्न तातडीने सोडविले जातील”, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे. (Ajit Pawar On Grapes Export)
Pomegranate Farming । डाळिंब फुगवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय, मिळेल भरघोस उत्पादन
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (Narayangaon) येथील हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या एकात्मिक कोल्ड पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेजच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. जुन्नरमधील हा पहिलाच एकात्मिक कोल्ड पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेज प्रकल्प आहे. याचे क्षेत्रफळ २४ हजार चौरस फूट असून कंपनीच्या एकूण तीन कोल्ड रूम आहेत.
यापैकी 75 टन क्षमता असणारे दोन तर ९० टन क्षमता असणारे एक कोल्ड स्टोरेज रूम आहेत. प्रीकुलिंगसाठी १० टनाच्या दोन रूम असून कंपनी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. खर्चाचा विचार केला तर या प्रोजेक्टला ५ कोटी रुपयांचा खर्च आला असून कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्रधिकरणामार्फत १ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान वितरीत केले आहे.
केला जाणार बांग्लादेशमध्ये निर्यातीसाठी प्रयत्न
दरम्यान, बांग्लादेशने द्राक्ष आयातीवर अतिरिक्त कर (Additional tax on grape imports) लावले असल्याने शेतकऱ्यांना या देशात द्राक्ष निर्यात करण्यास अडचण येत आहेत. त्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. निर्यातीबाबतचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्री व वाणिज्य मंत्री यांच्याशी चर्चा करून तो निकाली काढला जाणारा आहे.
Mahatama Phule Karj Yojana । शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत वाढ, प्रोत्साहन अनुदानाबाबत बैठक पडली लांबणीवर
केंद्र सरकारने शीत भांडारांवरील बंद केलेले अनुदान वितरण आता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही अजित पवार बोलताना म्हणाले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकात्मिक कोल्ड पॅक हाऊस व कोल्ड स्टोरेजच्या उद्घाटनावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते.
Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार