Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

बातम्या

Devendra Fadnavis । केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. पीएम मानधन योजना, पीएम किसान योजना, मागेल त्याला शेततळे योजना यांसारख्या अनेक योजना (Government schemes) सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. यापैकी सरकारची एक योजना म्हणजे जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना (Jalyukt Shivar Abhiyan 2.0 scheme) होय.

Mahatama Phule Karj Yojana । शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत वाढ, प्रोत्साहन अनुदानाबाबत बैठक पडली लांबणीवर

जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना

राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, या योजनेचा दुसरा टप्पा (Jalyukt Shivar Abhiyan) सुरू केला आहे. यामुळे पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश असून पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल.

Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार

यावर्षी आत्तापर्यंत एकूण 565 तलावातून सुमारे 83.39 लाख घनमीटर गाळ काढला आहे, ज्यामुळे 6000 लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सरकारी अनुदानाचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत. त्यांना जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज

निधीची कमतरता पडू देणार नाही – फडणवीस

सरकार या अभियानासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जो जिल्हा जास्त वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला जास्त निधी देण्यात येईल. आतापर्यंत पुणे, लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली या 5 जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली असून आता इतर जिल्ह्यांनी जास्त वेगाने कामे करावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहेत.

Farmer Success Story । दौंडच्या शेतकऱ्याची कमाल, ऊस शेतीला बगल देत फुलवली शेवंतीची बाग, जाणून घ्या नियोजन

नुकताच सह्याद्री अतिथीगृह येथे देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा घेतला असून त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे),मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते.

Success Story । मेहनतीच्या जोरावर दोन भावांनी केली शेततळ्यात शिंपल्यांची शेती, असं केलं नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *