Success Story । नैसर्गिक तसेच मानवनिर्मित समस्यांवर मात करत शेतकऱ्यांना शेती (Agriculture) करावी लागते. जर तुम्हाला शेतीतून जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि मनात जिद्द असावी लागते. हल्ली शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर (Farmer income) परिणाम होत आहे. अशाच दोन भांवंडांनी शेततळ्यात शिंपल्यांची शेतीचा प्रयोग केला आहे.
Wild Animal । जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय? गोमुत्राचा असा करा वापर
दुष्काळी परिस्थितीवर केली मात
अविनाश व दिपक कुंदे असे या शेतकरी बंधूंची नावे आहेत. ते छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरमधील खरज तालुक्यातील रहिवासी आहेत. वडील वासुदेव कुंदे यांना वडीलोपार्जित ४० एकर शेती आहे. पण ती दुष्काळी पट्ट्यात आहे. शिवाय या भागात मजुरांची टंचाई असते. त्यामुळे वासुदेव कुंदे यांनी दोन्ही मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यावर शेतीची जबाबदारी सोपवली.
Havaman Andaj | महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस?
त्यांच्याकडे सध्या ४० एकर क्षेत्रापैकी १६ एकर डाळिंब, सुपर गोल्डन जातीचे ७ एकर सिताफळ वर्षात आहे. उरलेल्या क्षेत्रात पारंपरिक मका, कपाशी, हरभरा, ज्वारी अशी पिके आहेत. ते वार्षिक एकरी टन शेणखत डाळिंबास देतात. शिवाय विविध सेंद्रिय अन्नद्रव्य देखील दिले जाते. तेल्या आणि इतर बुरशींसाठी वेळोवेळी बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या जातात.
शिंपले आणि मासे
इतकेच नाही तर कुंदे बंधूंनी शेततळ्यातील पाण्यात कोंबडा जातीच्या माशांचे बीज टाकले आहे. सोबत या पाण्यात २०२२ डिसेंबरमध्ये ३००० शिंपले (Mussel farming) सोडले असून त्याद्वारे आता मोती विक्री होईल. हे मोती विक्रीयोग्य आहे. पण त्याला सध्या खूप कमी बाजारभाव नाही. (Mussel farming information)
दरम्यान, कुंदे यांनी १०० रुपये प्रति शिंपला या दराने हे शिंपले विकत घेऊन ते पाण्यात सोडले. त्यांना वेळोवेळी स्पिरुलिनाचे खाद्य देण्यात येते. माश्यांच्या हालचालीमुळे शिंपल्यांना ऑक्सिजन मिळत असून यातून वार्षिक साधारण ३-३.५ लाख खर्च येतो.सध्या विक्री योग्य असणाऱ्या या मोत्यांमधून १२ ते १५ लाख रुपये अपेक्षित त्यांना आहे.