Success Story

Success Story । मानलं बुवा! सहा एकर चिकू बागेतून शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा

यशोगाथा

Success Story । अनेकजण शेती करत नाही कारण शेतीत प्रत्येकवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. परंतु जर तुम्ही बाजाराचा अभ्यास करून शेती केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. योग्य ते नियोजन आणि अथक मेहनतीतून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एका शेतकऱ्याने शेतीतून चांगले उत्पन्न घेतले आहे.

MGNREGA । आता घरबसल्या तपासा तुमच्या गावातील सुरु असणारी मनरेगाची कामे, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

बुलडाणा जिल्ह्यातील बोरी येथील रहिवासी असणाऱ्या चनखोरे बंधूनी सहा एकर चिकू बागेतून चांगली कमाई (Chiku Cultivation Success Story) केली आहे. विशेष म्हणजे ते २३ वर्षांपासून या बागेची (Chiku Cultivation) काळजी घेत आहेत. धोंडू कुंडलिक चनखोरे यांच्याकडे वडिलोपार्जित ४५ एकर शेती असून मुबलक प्रमाणात पाणी देखील आहे. ते पारंपरिक पिके घेतात. परंतु कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळावे यासाठी त्यांनी चिकूचे पीक घेतले. चनखोरे यांच्या चिकूला परराज्यांत जास्त मागणी आहे.

Success Story । शेतकऱ्याचा नादच नाही! अवघ्या एका एकरात घेतले कोहळ्याचे पाच टन उत्पन्न

कृषी विद्यापीठाला भेट

२००० साली धोंडू यांचा मुलगा गजानन यांनी काही शेतकऱ्यांसह राहुरी कृषी विद्यापीठाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या पिकाची अधिक माहिती जाणून घेतली. त्यांना तत्कालीन कृषी सहायक मोहन पवार यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानुसार त्यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून कलमे आणून ३३ बाय ३३ फूट अंतरावर कालीपती वाणाच्या चिकूच्या झाडांची लागवड केली.

Dhananjay Munde । दिवाळीच्या तोंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी केली सर्वात मोठी घोषणा

अशी घेतली काळजी

चिकूची झाडे १० वर्षांची होईपर्यंत त्यांनी आंतरपीक घेतले. या झाडांना रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत व गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. महत्त्वाचे म्हणजे फूल पोखरणारी अळी ही समस्या असून, जुलै ते सप्टेंबर या काळात अळी जास्त सक्रिय असते. धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर करून अळीवर नियंत्रण मिळवले जाते. परंतु तापमान वाढले की फुलगळीचाही धोका जास्त असतो.

Havaman Andaj । ऐन थंडीत बसरणार मुसळधार पाऊस, काही तासांतच ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा; हवामान विभागाने दिला अलर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *