Drought in Marathwada

Drought in Marathwada । “मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, नाहीतर 10 हजार शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू” – रोहित पवार

बातम्या

Drought in Marathwada । यावर्षी राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. नदी, नाले आणि धरणांमधील पाणीपातळी देखील तळ गाठू लागली आहे. पाण्याविना पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठे आर्थिक संकट आले आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.

Success Story । मानलं बुवा! सहा एकर चिकू बागेतून शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात (Marathwada) दिवाळीपूर्वी दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, नाहीतर 10 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. याबाबत रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे.

MGNREGA । आता घरबसल्या तपासा तुमच्या गावातील सुरु असणारी मनरेगाची कामे, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

दिवाळीपूर्वी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा

“मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु केवळ 14 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं जाहीर केलेलं हेक्टरी 13 हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेले नाही. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी सवलती लागू करून गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचं अनुदान आणि पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम दिली जावी,” अशा आशयाचे ट्विट पवार यांनी केले आहे.

Success Story । शेतकऱ्याचा नादच नाही! अवघ्या एका एकरात घेतले कोहळ्याचे पाच टन उत्पन्न

रोहित पवार यांनी या मागणीचं निवेदन मराठवाडा विभागाच्या विभागीय आयुक्तांकडं दिले आहे. जर दिवाळीच्या अगोदर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांची मागणी मान्य होणार का? याकडे संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

Dhananjay Munde । दिवाळीच्या तोंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी केली सर्वात मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *