Milk Production । दुधाकडे पूर्ण अन्न म्हणून पाहिले जाते. दुधात आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक असतात. भारताच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे खूप मोठे योगदान आहे. देशाचा दूध उत्पादनात जगामध्ये पहिला नंबर (Milk Production in India) लागतो. विशेष म्हणजे जागतिक दूध उत्पादनात (Milk) भारताचे योगदान 24 टक्के इतके आहे. देशातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असे आहे.
सर्वाधिक दूध उत्पादक राज्य
देशात अशी काही चार राज्य आहेत जिथे दुधाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. सर्वात जास्त उत्पादनात राजस्थान पहिल्या नंबरवर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. भारतातील एकूण दूध उत्पादनात राजस्थानचा १५.०५ टक्के वाटा आहे. तर उत्तर प्रदेश दुसऱ्या नंबरवर आहे. मध्य प्रदेश तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या नंबरवर आहे.
Success Story । मानलं बुवा! सहा एकर चिकू बागेतून शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा
ऑपरेशन फ्लड
देशात शेतीशी निगडित असणारा दुग्धव्यवसाय हा परंपरागत पद्धतीने सुरू आहे. डॉ. वर्गीज कुरियन यांनी १९७० मध्ये ‘ऑपरेशन फ्लड’ ही योजना राबवली होती. त्यामुळे अमुलच्या माध्यमातून दूध उत्पादनाबाबत श्वेतक्रांती घडवून आणली होती, त्यानंतर सर्व राज्यांत सहकारी दूध संघ जोमाने काम करू लागले होते. सध्या देशात दुधाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
MGNREGA । आता घरबसल्या तपासा तुमच्या गावातील सुरु असणारी मनरेगाची कामे, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने आघाडीवर आहे. पुढील दशकभरातच सर्वात जास्त लोकसंख्या ही भारताची ओळख बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नाही तर २०२६ पर्यंत जगातील सर्वात जास्त दुग्ध उत्पादन भारतात होऊ शकते. ज्याचा फायदा दूध उत्पादकांना जास्त होईल.
Success Story । शेतकऱ्याचा नादच नाही! अवघ्या एका एकरात घेतले कोहळ्याचे पाच टन उत्पन्न