Agriculture News

Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार

बातम्या

Agriculture News । मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे (Unseasonal rain) प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सतत विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे (Government decisions) शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

हवामान केंद्र होणार बंद

अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाच्या होणाऱ्या बदलापासून (Climate change) शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची (Agricultural Meteorological Station) स्थापना केली आहे. हवामान केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळत होता. पण आता हे सर्व कृषी हवामान केंद्र (Weather station) बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Havaman Adnaj । शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता, जाणून घ्या

दरम्यान, भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 मध्ये संपूर्ण देशात 199 जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना केली होती. यात महाराष्ट्रातील 11 कृषी हवामान केंद्राचा समावेश होता. इतकेच नाही तर कृषी हवामान तज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक अशी दोन पदे देखील केंद्रात भरली होती.

Success Story । व्वा रे पठ्ठया! कपाशीला फाटा देत केली तुरीची लागवड, आज कमावतोय लाखो रुपये; कसे ते जाणून घ्या

त्याच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित पाच दिवसीय कृषी सल्ला दिला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे नुकसान टाळता येत होते. अशातच आता सरकारने देशातील हे सर्व 199 केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील 30 कोटी शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Milk Rate । पशुपालकांना मोठा धक्का! दुधाच्या दरात पुन्हा घसरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *