Havaman adnaj

Havaman adnaj । शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता, जाणून घ्या

हवामान

Havaman adnaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने हजेरी (Rain in Maharashtra) लावली आहे.

Success Story । व्वा रे पठ्ठया! कपाशीला फाटा देत केली तुरीची लागवड, आज कमावतोय लाखो रुपये; कसे ते जाणून घ्या

हवामान खात्याने दिला इशारा

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिला आहे. यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आता हवामान खात्याकडून (IMD) आजही राज्यात पावसाचा इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

Milk Rate । पशुपालकांना मोठा धक्का! दुधाच्या दरात पुन्हा घसरण

‘या’ भागात पडणार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात आगामी 2-3 दिवस अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातदेखील पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Crop Insurance । मोठी बातमी! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पीकविमा परतावा

त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, नागपूर, वर्धा, अमरावती, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे.

Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद

काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जर यावेळी शेतीचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. ऐन थंडीच्या दिवसात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Potato Price । बापरे! अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *