Farmers Protest

Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद

बातम्या

Farmers Protest । विविध मागण्यांसाठी नवी दिल्ली या ठिकाणी पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांकडून 13 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारविरोधात (Central Govt) आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली आहे. चलो दिल्लीचा नारा देत शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. (Farmers Protest In New Delhi)

Potato Price । बापरे! अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित

कलम 144 लागू

याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अंबाला येथे कलम 144 लागू (Section 144) करण्यात आले आहे. एडीजीपींनी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सांगितले की, बाधित जिल्ह्यांमध्ये विशेषतः अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, फतेहाबाद, सिरसा येथे वाहतूक वळवण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील इतर सर्व मार्गांवरील वाहतूक स्थिती सामान्य राहणार आहे.

Ritha Farming । शेतकरी बंधुनो, ‘या’ झाडांची लागवड करून एकरात मिळवा 10 लाखांचं उत्पन्न

हरियाणातील किमान 12 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू केले आहे. चंदीगडला लागून असलेल्या पंचकुलामध्येही कलम 144 लागू असून हा आदेश पंचकुलाचे डीसीपी सुमेर सिंह प्रताप यांनी जारी केला आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असणार आहे.

Cotton Rate । कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, पेटवून दिली कापसाने भरलेली गाडी

इंटरनेट सेवा बंद

हरियाणाच्या गृह विभागाने शनिवारी एक आदेश जारी केला की, अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद, सिरसा आणि पोलीस जिल्हा डबवली येथे 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 13 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि डोंगल सेवा बंद (Internet service off) ठेवली जाणार आहे.

Havaman Adnaj । ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

वैयक्तिक एसएमएस, बँकिंग एसएमएस, ब्रॉडबँड आणि लीज लाइन पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा किंवा ट्रॅक्टर-ट्रॉली व इतर वाहनांसह लाठ्या-काठ्या, शस्त्रे घेऊन जाता येणार नाही. हरियाणा आणि पंजाबच्या 23 शेतकरी संघटनांचे असे मत आहे की जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्यांबाबत काही ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत त्यांचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर

दरम्यान, शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ 12 फेब्रुवारी रोजी चंदीगड येथील महात्मा गांधी स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सेक्टर 26 येथे केंद्र सरकारशी पुन्हा चर्चा करणार आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची पहिली फेरी 8 फेब्रुवारी रोजी येथे झाली आहे. आता सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पीयूष गोयल आणि नित्यानंद राय बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पन्नास हजार रुपये,अजित पवार यांची मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *