Mahatma Phule Yojana

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पन्नास हजार रुपये,अजित पवार यांची मोठी घोषणा

बातम्या

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government schemes) सुरु केल्या आहेत. यामुळे त्यांना आर्थिक मदत होते. देशातील लाखो शेतकरी सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Onion Rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ५० हजार रुपये

राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) पार पडणार आहेत. या निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. सरकार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजना (Mahatma Jyotirao Phule Debt Relief Incentive Grant Scheme) सुरु केली आहे. आता या योजनेंतर्गत नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Farmers Help । शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, सोशल मीडियावर समजताच केली चक्क 80 हजाराची मदत

अजित पवार यांची मोठी घोषणा

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन टप्प्यात खात्यात अनुदान दिले असून तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थीना अजूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी यापासून वंचित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बोलताना लोकसभा निडणुकीपूर्वी पैसे वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची ग्वाही दिली.

Farmer Accident Insurance । मोठी बातमी! अपघात विम्यापोटी 48 कोटींचा निधी मंजूर

बोलताना अजित पवार म्हणाले की, “शेतकऱ्यांना डायरेक्ट इन डायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे. मला याबाबत सतत विचारणा होत आहे. आम्ही मागे महाआघाडीचे सरकार असताना वेळेत कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले. दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी केली. पण 70 हजार पेक्षा जास्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत.

Success Story । इंजिनीअरिंगच्या नोकरीला ठोकला रामराम! टोमॅटोच्या शेतीतून ‘हा’ पठ्ठया मिळवतोय लाखोंचा नफा

“कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या जास्त असल्याने मी यामध्ये विशेष लक्ष घालणार आहे. एका आर्थिक वर्षात दोन वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव काही शेतकरी आणि जास्तीत जास्त कोल्हापूर मधील शेतकरी वंचित आहेत. चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरीवर्ग खूप संकटात आला आहे. जर शेतकरीच मोडला तर राज्य मोडेल त्यामुळे त्या शेतकऱ्याला पुन्हा ताठपणे उभा करण्याच्या आमचा प्रयत्न आहे,” असेही अजित पवार म्हणाले आहेत.

Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *